40 वर्षात पृथ्वीवरील वन्यजीव 52 टक्क्यांनी घटले!

By admin | Published: October 1, 2014 02:44 AM2014-10-01T02:44:42+5:302014-10-01T02:44:42+5:30

1970 ते 2क्1क् या 4क् वर्षाच्या काळात, आधी मानले जात होते त्याहून अधिक म्हणजे 52 टक्क्यांनी घट झाली असल्याचे ‘वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड’ (डब्ल्यूडब्ल्यूएफ)ने म्हटले आहे.

The wildlife of the earth decreased by 52 percent in 40 years! | 40 वर्षात पृथ्वीवरील वन्यजीव 52 टक्क्यांनी घटले!

40 वर्षात पृथ्वीवरील वन्यजीव 52 टक्क्यांनी घटले!

Next
>जिनिव्हा : मासे, पक्षी, सजीव प्राणी, जलचर आणि सरपटणा:या प्राण्यांसह पृथ्वीवरील एकूणच वन्यजीवांच्या संख्येत 1970 ते 2क्1क् या 4क् वर्षाच्या काळात, आधी मानले जात होते त्याहून अधिक म्हणजे 52 टक्क्यांनी घट झाली असल्याचे ‘वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड’ (डब्ल्यूडब्ल्यूएफ)ने म्हटले आहे.
निसर्गरक्षणासाठी काम करणारी ही स्वयंसेवी संघटना दर दोन वर्षानी पृथ्वीवरील सजीवसृष्टीच्या सद्य:स्थितीविषयी ‘लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट’ नावाचा अहवाल प्रसिद्ध करीत असते. 
आता प्रसिद्ध केलेल्या अहवालात जागतिक वन्यजीव निधी म्हणते की, वृक्षतोड, भूजलाचा वारेमाप उपसा आणि पृथ्वीचे वातावरण जिरवून घेऊ शकेल त्याहून अधिक प्रमाणात होणारे कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सजर्न यामुळे मानव निसर्गाच्या सहनशीलतेहून 5क् टक्के अधिक साधने त्याच्याकडून ओरबाडत आहे.
तरीही राजकारणी नेते आणि व्यापर-उद्योगाच्या धुरिणांनी निसर्गाचे रक्षण करण्यासाठी योग्य कृती केली, तर अजूनही परिस्थिती हाताबाहेर न जाण्याची शक्यता शिल्लक आहे, यावर अहवालात भर देण्यात आला आहे.
अहवाल प्रसिद्ध करताना संस्थेचे आंतरराष्ट्रीय महासंचालक मार्को लॅम्बेर्टिनी म्हणाले की, शक्य आहे तोवर आपण या संधीचा लाभ घेऊन शाश्वत विकासाची कास धरत निसर्गाशी समरस होऊन जगण्याचा व विकास करण्याचा मार्ग शोधण्याची गरज आहे. अहवाल म्हणतो की, वन्यजीवांच्या संख्येत झालेली ही घट विषुववृत्तीय प्रदेशांत व खास करून लॅटिन अमेरिकेत सर्वाधिक असल्याचे दिसून येते. गोडय़ा पाण्यातील मत्स्य प्रजातींमध्ये ही घट सर्वाधिक म्हणजे 78 टक्के आढळून आली. सागरी आणि जमिनीवरील वन्यजीवांमध्ये ही घट प्रत्येकी 39 टक्के झाल्याचा अंदाज आहे.  याआधीच्या अहवालात 197क् ते 2क्क्8 या काळात ही घट 28 टक्के झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्या तुलनेत आताच्या ताज्या अहवालातील सुधारित आकडेवारी अधिक गंभीर स्थिती दर्शविणारी            आहे. (वृत्तसंस्था)
 
नऊपैकी तीन हद्दी ओलांडल्या
आपल्याला ज्ञात असलेली सजीवसृष्टी टिकून राहायची असेल, तर पृथ्वीने नऊ बाबतींत हद्द ओलांडता कामा नये, अशी संकल्पना मांडून वैज्ञानिकांनी त्यांना ‘प्लॅनेटरी बाऊंडरीज’ असे संबोधले आहे. अहवाल म्हणतो की, जैवविविधता, वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण आणि रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे होणारे नत्रप्रदूषण या बाबतीत या संकल्पित हद्दी याआधीच ओलांडल्या गेल्या आहेत. याशिवाय सागरांचे वाढते आम्लीकरण व गोडय़ा पाण्यातील स्फूरदाचे प्रमाण या आणखी दोन हद्दी ओलांडल्या जाण्याच्या बेतात आहेत.
 
मानवजात टिकवून ठेवण्याचे काम
निसर्गाचे रक्षण करणो म्हणजे केवळ वन्यजीवांच्या अधिवासाचे रक्षण करणो नव्हे. हे खरे तर मानवजात टिकवून ठेवण्याचे व तिचे भवितव्य सुरक्षित करण्याचे हे काम आहे, असे डब्ल्यूडब्ल्यूएफचे महासंचालक मार्को लॅम्बेर्टिनी यांनी सांगितले.

Web Title: The wildlife of the earth decreased by 52 percent in 40 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.