९/११ हल्ल्यातील पीडित सौदी अरेबिया विरुद्ध खटला दाखल करणार ?
By admin | Published: September 9, 2016 11:00 PM2016-09-09T23:00:25+5:302016-09-09T23:00:25+5:30
दहशतवादी हल्ल्यातील पीडित व त्यांच्या कुटुंबियांना थेट सौदी अरेबिया सरकारविरुद्ध खटला दाखल करण्याची परवानगी देणा-या विधेयकाला अमेरिकन प्रतिनिधीगृहाने शुक्रवारी मंजुरी दिली.
Next
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. ९ - अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडित व त्यांच्या कुटुंबियांना थेट सौदी अरेबिया सरकारविरुद्ध खटला दाखल करण्याची परवानगी देणा-या विधेयकाला अमेरिकन प्रतिनिधीगृहाने शुक्रवारी मंजुरी दिली. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर पीडितांना सौदी अरेबिया सरकार विरुद्ध नुकसानभरपाईचा दावा ठोकण्याचा अधिकार मिळणार आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा अशा प्रकारच्या विधेयकाला विरोध असून, या विधेयकाचा मार्ग रोखण्यासाठी ते विशेषाधिकार विटोचा वापर करु शकतात. अमेरिकन प्रतिनिधीगृहाने आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर केले.
सौदी अरेबियाने या विधेयकाला जोरदार विरोध केला असून, या विधेयकावरुन अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या संबंध बिघडले आहेत. ९/११ दहशतवादी हल्ल्यातील १९ पैकी १५ अतिरेकी सौदी अरेबियाचे नागरीक होते.