America Default : अमेरिका डिफॉल्टर होणार? जगात हाहाकार उडण्याची शक्यता; चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 06:03 PM2023-05-20T18:03:51+5:302023-05-20T18:04:14+5:30

जगातील सर्वात मोठी महासत्ता मानल्या जाणार्‍या अमेरिकेवर डिफॉल्ट होण्याच्या धोका आहे.

Will America default how much impact in the world political parties economy | America Default : अमेरिका डिफॉल्टर होणार? जगात हाहाकार उडण्याची शक्यता; चिंता वाढली

America Default : अमेरिका डिफॉल्टर होणार? जगात हाहाकार उडण्याची शक्यता; चिंता वाढली

googlenewsNext

जगातील सर्वात मोठी महासत्ता मानल्या जाणार्‍या अमेरिकेवर डिफॉल्ट होण्याच्या धोका आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची सत्ताधारी डेमोक्रेटिक पार्टी आणि विरोधी पक्ष रिपब्लिकन पार्टी यांच्या कर्ज घेण्याची मर्यादा वाढवण्यावरून तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान, दोन्ही पक्षांच्या या राजकीय खेळीत अमेरिका डिफॉल्ट झाल्यास जगासाठी हे धोकादायक ठरू शकतं अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केलीये.

१९ जून रोजीच अमेरिकेनं आपली कर्ज घेण्याची निश्चित मर्यादा ओलांडली होती. तेव्हा युएस ट्रेजरनं डिफॉल्टपासून वाचण्यासाठी अनेक पावलं उचलली होती. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. परंतु जर हीच परिस्थिती कायम राहिली तर कर्ज न फेडल्यास अमेरिका डिफॉल्ट होऊ शकतो.

किती आहे शक्यता? 

न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक लॉरेन्स जे व्हाईट यांनी अल जझीराशी यासंदर्भात संवाद साधला. याविषयी कोणीही काहीही बोलू शकत नाही कारण हा राजकीय मुद्दा आहे. मला आशा आहे की यावर तोडगा निघेल. पण हा राजकीय पक्षांचा खेळ आहे. यामध्ये दोघांपैकी एकाला माघार घ्यावी लागेल. पण दोन्ही बाजूंपैकी एक माघार घ्यायला तयार झाले नाही तर हा चिंतेचा विषय ठरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

डिफॉल्टची तारीख जवळ आल्यानं दोन्ही पक्षांमधील वादाबद्दल चिंता वाढली आहे, अशी प्रतिक्रिया मूडीज अॅनालिटिक्सचे सहयोगी संचालक बर्नार्ड यारोस यांनी दिली. एप्रिलमध्ये टॅक्स कलेक्शन कमी झाल्यामुळे, डिफॉल्टची तारीख ऑगस्टऐवजी १ जून असल्याचं सांगितलं जात आहे.

जर अमेरिका एका आठवड्यासाठीही डिफॉल्ट झाला तर त्याचे गंभीर परिणाम गोऊ शकतात. यानंतर २००८ प्रमाणे आर्थिक मंदी येऊ शकते असं यारोस यांचं म्हणणं आहे. तसंच अमेरिकेला आपल्या खर्चात कपात करावी लागणार आहे. यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर आणि विकासावर त्याचे परिणाम होणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

Web Title: Will America default how much impact in the world political parties economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.