आणखी एक युद्ध भडकणार? लेबनाननं इस्रायलवर 40 रॉकेट डागले; इराणनं जहाजावर केला कब्जा, 17 भारतीय अडकले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 09:59 PM2024-04-13T21:59:07+5:302024-04-13T22:00:56+5:30

या जहाजावर 17 भारतीय नागरिक असल्याचे समजते. या घटनांमुळे या भागातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

Will another war break out in the world Lebanon fired 40 rockets at Israel iran took israeli ship hostage | आणखी एक युद्ध भडकणार? लेबनाननं इस्रायलवर 40 रॉकेट डागले; इराणनं जहाजावर केला कब्जा, 17 भारतीय अडकले!

आणखी एक युद्ध भडकणार? लेबनाननं इस्रायलवर 40 रॉकेट डागले; इराणनं जहाजावर केला कब्जा, 17 भारतीय अडकले!


इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आता लेबनान आणि इराणनेही उडी घेतली आहे. लेबनान आणि इराण, या दोन्ही देशांनी इस्रायलला एकाच वेळी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. लेबनानने इस्रायलवर एक दोन नव्हे, तब्बल 40 रॉकेट दागले आहेत. तर इराणने इस्रायलचे जहाज ओलीस ठेवले आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सनी इस्रायलचे कंटेनर जहाज MSC ARIES वर नियंत्रण मिळवले आहे. या जहाजावर 17 भारतीय नागरिक असल्याचे समजते. या घटनांमुळे या भागातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

इराण आणि लेबनानचे संयुक्त सेन्य, हिजबुल्लाहने म्हटले आहे की, त्यांनी दक्षिण लेबनानमधील इस्रायली सैनिकांच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलवर डझनावर रॉकेट डागले आहेत. तसेच, गाझा युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक हला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आपण उत्तर इस्रायल आणि गोलान हाइट्समध्ये इस्रायलच्या सैन्याला टार्गेट करत डझनावर कत्युशा रॉकेट डागले, अशी पुष्टीही लेबनान गटाने केली आहे.

लेबनानच्या हल्ल्यानंतर, इस्रायली सेन्याने दिलेल्या माहितीनुसार, लेबनानच्या हल्ल्यातील 40 रॉकेटपैकी काही रॉकेट उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच काही रॉकेट मोकळ्या जागेत जाऊन पडले. या हल्ल्यात कुठल्याही प्रकारची जीवीत हाणी झाल्याचे वृत्त नाही. 

गाझामध्ये 7 ऑक्टोबरला युद्ध सुरू झाल्यापासून, पॅलेस्टाइनच्या हमासचे सहकारी हिजबुल्लाह आणि इस्रायलच्या सैन्यादरम्यान सीमेवर रोज गोळीबार सुरू आहे. युद्ध थांबल्यानंतर आपण इस्रायलवरील हल्ले थांबवू, असेही हिजबुल्लाहने म्हटले आहे.
 

Web Title: Will another war break out in the world Lebanon fired 40 rockets at Israel iran took israeli ship hostage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.