आणखी एक युद्ध भडकणार...? अमेरिकेच्या धमकीनंतर इराणचं प्रत्युत्तर, 3000 जहाजं उतरवली समुद्रात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 11:49 IST2025-03-28T11:48:17+5:302025-03-28T11:49:39+5:30
इराण पॅलिस्टिनींना प्रोत्साहन देतो, असा आरोप अमेरिकेकडून सातत्याने केला जातो. याशिवाय, इराणला याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही अमेरिकेकडून वारंवार दिली जाते. मात्र, अमेरिकेच्या या धमक्यांचा इराणवर कसलाही परिणाम होत नाही.

आणखी एक युद्ध भडकणार...? अमेरिकेच्या धमकीनंतर इराणचं प्रत्युत्तर, 3000 जहाजं उतरवली समुद्रात!
अमेरिका आणि इराण यांचे संबंध सर्वांनाच परिचित आहेत. इराण पॅलिस्टिनींना प्रोत्साहन देतो, असा आरोप अमेरिकेकडून सातत्याने केला जातो. याशिवाय, इराणला याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही अमेरिकेकडून वारंवार दिली जाते. मात्र, अमेरिकेच्या या धमक्यांचा इराणवर कसलाही परिणाम होत नाही. उलट, अनेक वेळा इराणकडूनही अमेरिकेला जशास तसे उत्तर दिले जाते. दरम्यान, इराणने आता आपल्या प्रतिस्पर्धी देशांना आणखी एक थेट संदेश दिला आहे.
अमेरिकेच्या धमकीनंतर, इराणची मोठी प्रतिक्रिया -
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच एक मोठे विधान केले होते. आपण पॅलिस्टिनींना समूळ नष्ट करू, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. याशिवाय, इराण पॅलिस्टिनींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानानंतर, इराणे शक्तीप्रदर्शन करत, आपली ताकद दाखविण्याचा निर्णय घेतला आणि एका मोठ्या नौदल परेडचे आयोज केले. इराणच्या या विशाल नौदल शक्ती प्रदर्शनात 3,000 हून अधिक जहाजे सहभागी झाले आहेत.
इराणने ओमानच्या आखातात या विशाल नौदल सरावाला सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे हा सराव इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान होत आहे. महत्वाचे म्हणजे, इराणवर अधिकाधिक दबाव वाढविणे, हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचा भाग आहे.
इराणचे शक्ती प्रदर्शन -
इराणने पर्शियन आखातात 3,000 जहाजांसह नौदलाच्या सरावाला सुरुवात केली आहे. या सरावात इराण आणि त्यांच्या समर्थक देशांनीही सहभाग घेतला आहे. लेबनान, इराक आणि यमनसह इराणच्या इतर समर्थक देशांच्या जहाजांनीही या परेडमध्ये भाग घेतला आहे.
इराणच्या या नौदल सरावाकडे, त्यांचे शक्ती प्रदर्शन म्हणून बघितले जात आहे. तसेच इराणने, हा सराव म्हणजे, नौदल शक्तीचे प्रदर्शन आणि अमेरिका-इस्रायलसाठी एक संदेश, असल्याचे म्हटले आहे.