अमेरिकी लष्करात तृतीयपंथींना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:21 AM2017-07-27T03:21:05+5:302017-07-27T03:21:07+5:30

अमेरिकेच्या लष्करात यापुढे तृतीयपंथी व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही किंवा थाराही दिला जाणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एका टिष्ट्वटव्दारे जाहीर केले

Will be captive American Army Hindsight | अमेरिकी लष्करात तृतीयपंथींना बंदी

अमेरिकी लष्करात तृतीयपंथींना बंदी

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या लष्करात यापुढे तृतीयपंथी व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही किंवा थाराही दिला जाणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एका टिष्ट्वटव्दारे जाहीर केले. तृतीयपंथींमुळे प्रचंड वैद्यकीय खर्च येतो व लष्कराच्या शिस्तीलाही बाधा येते.
निर्णायक आणि सर्वंकष विजय हेच लष्कराचे एकमेव ध्येय असायला हवे, असे ट्रम्प यांनी म्हटले. याआधीच्या ओबामा प्रशासनाने लष्करातील तृतीयपंथींना तसे जाहीरपणे उघड करण्यास व तृतीयपंथींची लष्करात भरती करण्यास अनुमती दिली होती. अमेरिकेच्या एकूण १३ लाखांच्या सक्रिय लष्करात सुमारे ४,२५० तृतीयपंधी असल्याचा अंदाज आहे.

Web Title: Will be captive American Army Hindsight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.