डिपेंडंट व्हीसावर अमेरिकेत शिक्षण घेता येईल?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 06:05 PM2018-03-16T18:05:14+5:302018-03-16T18:10:35+5:30
माझे पती वर्क व्हीसावर अमेरिकेला जात आहेत आणि त्यांच्याबरोबर मी डिपेंडंट व्हीसावर जात आहे. अशा स्थितीत अमेरिकेत गेल्यावर मी काम किंवा शिक्षण घेऊ शकेन का?
प्रश्न- माझे पती वर्क व्हीसावर अमेरिकेला जात आहेत आणि त्यांच्याबरोबर मी डिपेंडंट व्हीसावर जात आहे. अशा स्थितीत अमेरिकेत गेल्यावर मी काम किंवा शिक्षण घेऊ शकेन का?
उत्तर- साधारणत: डिपेंडंट व्हीसावर तुम्हाला काम काम करण्याची परवानगी मिळत नाही. अमेरिकेत काम करण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र वर्क व्हीसा मिळवावा लागेल. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये तुम्हाला युनायटेड स्टेट्स सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्विसेस (युसिस)कडून काम करण्याची परवानगी मिळवावी लागते. मात्र तुम्ही अमेरिकेत शिक्षण घेऊ शकाल. जर तुमचा जोडीदार अमेरिकेत काम करत असेल तर तुम्ही एका मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता. मात्र त्या संस्थेला अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड क्सटम्स एन्फोर्समेंट (आयसीई) तसेच स्टुडंट एक्स्चेंज व्हीजीटर प्रोग्राम (एसईव्हीपी)ने प्रमाणित केलेले असावे. प्रमाणित संस्थांची माहिती तुम्हाला एसईव्हीपीच्या संकेतस्थळावर मिळू शकेल. काही अभ्यासक्रमांमधील करिक्युलर प्रॅक्टीकल ट्रेनिंग (सीपीटी) आणि आॅप्शनल प्रॅक्टीकल ट्रेनिंग (ओपीटी)मध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला स्टुडंट व्हीसा लागेलच. स्टुडंट व्हीसा नसेल तर स्कॉलरशिप आणि आर्थिक मदत मिळण्याची संधी मर्यादीत होऊ शकते. अशा अभ्यासक्रमांसाठी आपल्याला स्टुडंट व्हीसासाठी अर्ज करावा लागेल. थोडक्यात अमेरिकेत डिपेंडंट व्हीसावर आलेल्या लोकांना युसिसने विशेष मान्यता दिल्याशिवाय काम करण्याची परवानगी नाही हे लक्षात घ्या. अशा अनधिकृत कामात सहभागी होणे तुमच्या कुटुंबाचे अमेरिकेतील कायदेशीर असलेलं स्थान धोक्यात आणणारं असेल.