समुद्रातच राहाणारी बाडजो प्रजाती समाप्त होणार?
By admin | Published: April 23, 2017 12:38 AM2017-04-23T00:38:20+5:302017-04-23T00:38:20+5:30
बाडजो नावाची प्रजाती जगात अशी एक आहे की, तिचा जास्तीत जास्त वेळ समुद्रात जातो. ही प्रजाती जिप्सी नावाने ओळखले जाते. ती समुद्रात राहाते व त्यांचा जास्तीत
Next
बाडजो नावाची प्रजाती जगात अशी एक आहे की, तिचा जास्तीत जास्त वेळ समुद्रात जातो. ही प्रजाती जिप्सी नावाने ओळखले जाते. ती समुद्रात राहाते व त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा हाउसबोटीवर जाते. या प्रजातीचे लोक बर्निओ, इंडोनेशिया आणि फिलिपिन्समध्ये पूर्ण स्वातंत्र्यासह फिरत असत, परंतु आता ही प्रजाती समाप्त होण्याच्या काठावर पोहोचली आहे. ही प्रजाती मूलत: इंडोनेशियात राहायची. हे लोक समुद्रातच लूट करायचे, परंतु आता मासेमारीसाठी अत्याधुनिक नावा, बोटी वापरात असल्यामुळे त्यांची संख्या घटत आहे. समुद्रामध्ये राहाणारी जगातील ही एकमेव प्रजाती आहे.