युरोप घालणार भारत-चीनच्या कंपन्यांवर बंदी?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 05:46 AM2024-02-16T05:46:35+5:302024-02-16T05:47:40+5:30
रशियाला मदत करणाऱ्या कंपन्यांची एक यादी युरोपीय संघाने तयार केली आहे. त्यांच्यावर प्रतिबंध घालण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यासह अनेक देशांच्या कंपन्यांवर बंदी घालण्याची तयारी युरोपीय संघाने चालविली आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धात या कंपन्या रशियाला मदत करीत असल्याचा युरोपीय संघाचा आरोप आहे.
रशियाला मदत करणाऱ्या कंपन्यांची एक यादी युरोपीय संघाने तयार केली आहे. त्यांच्यावर प्रतिबंध घालण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास चिनी कंपन्यांवर थेट प्रतिबंध घातला जाण्याची ही पहिलीच घटना ठरेल. प्राप्त माहितीनुसार, ज्या कंपन्यांवर बंदी घालण्यात येणार आहेत, त्यात हाँगकाँग, सर्बिया, भारत, तुर्कस्तान आणि चीन या देशांच्या कंपन्यांचा समावेश आहे.