‘मुंबई हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देणार’

By admin | Published: August 5, 2015 11:12 PM2015-08-05T23:12:57+5:302015-08-05T23:12:57+5:30

२००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सर्व पीडितांना न्याय मिळवून देण्यास अमेरिका बांधील आहे, असे भारतीय वंशाच्या अमेरिकी सहायक

'Will get justice for victims of Mumbai attack' | ‘मुंबई हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देणार’

‘मुंबई हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देणार’

Next

न्यूयॉर्क : २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सर्व पीडितांना न्याय मिळवून देण्यास अमेरिका बांधील आहे, असे भारतीय वंशाच्या अमेरिकी सहायक परराष्ट्रमंत्री निशा बिस्वाल यांनी म्हटले आहे.
निशा भारतीय वकिलातीत मीडिया-इंडिया लेक्चर सिरीजमध्ये व्याख्यान देण्यासाठी न्यूयॉर्कला आल्या होत्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील महिन्यात होणाऱ्या अमेरिकेच्या दुसऱ्या दौऱ्याबाबत देश खूपच आशावादी असून, या दौऱ्यात उभय देशांदरम्यान होणाऱ्या तंत्रज्ञान भागीदारीबाबत सिलिकॉन व्हॅलीमध्ये प्रचंड उत्साह आहे, असे बिस्वाल म्हणाल्या.
(वृत्तसंस्था)

Web Title: 'Will get justice for victims of Mumbai attack'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.