दाऊद पर्यंत पोहचण्यास मदत करेन - छोटा राजन

By admin | Published: November 2, 2015 04:52 PM2015-11-02T16:52:41+5:302015-11-02T16:58:22+5:30

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा एकेकाळी उजवा हात असणारा राजन नंतर त्याचा क्रमांक एकचा शत्रू झाला. दाऊद हा १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे.

Will help to reach Dawood - Chhota Rajan | दाऊद पर्यंत पोहचण्यास मदत करेन - छोटा राजन

दाऊद पर्यंत पोहचण्यास मदत करेन - छोटा राजन

Next
>ऑनलाइन लोकमत
बाली (इंडोनेशिया), दि. २ -  पाकिस्तानात लपून बसलेल्या दाऊद इब्राहिमपर्यंत पोचण्यासाठी भारताला मी मदत करीन असा दावा छोटा राजनने केला आहे. जवळपास दोन दशके फरार असलेल्या व खून, खंडणीसारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये भारताला हवा असलेल्या छोटा राजनला गेल्या आठवड्यात बालीमध्ये विमानतळावर अटक करण्यात आले. आज किंवा उद्या त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
कुख्यात गँगस्टर छोटा राजनला भारतात आणण्याची प्रक्रिया भारताने पुर्ण केली आहे. केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेचे (सीबीआय) पथक राजनला घेऊन इंडोनेशियातील विमानतळावर पोहोचले आहेत. या पथकात मुंबईतील गुन्हे शाखेतील तिघांचा समावेश आहे. छोटा राजनला २४ ऑक्टोबरला बालीमध्ये अटक करण्यात आली होती. 
मुंबईत जन्मलेला छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे कधीकाळी दाऊदचा निकटवर्तीय होता. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर दोघे वेगळे झाले. राजनवर मुंबईत हत्या, तस्करी, खंडणी, ड्रग्ज तस्करी यासारखे ७५ गुन्ह्यांची नोंद आहे. २० वर्षापासून सुरक्षा यंत्रणांनेला चकमा देणाऱ्या राजनला इंटरपोलने काढलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे अटक करण्यात आली.
पत्रकारांशी बोलताना राजनने दाऊद हा पाकिस्तानातच असल्याचा आणि त्याला ISI ने लपवून ठेवल्याचा दावा केला आहे. राजन व दाऊद दोघेही एकमेकांना संपवण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे राजनची अटक दाऊद पर्यंत पोचण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणेसाठी उपयोगाची आहे का हे येता काळच सांगेल.

Web Title: Will help to reach Dawood - Chhota Rajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.