चीनला रोखण्यासाठी सुरक्षा सामर्थ्य वाढवणार; ऑस्ट्रेलिया संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 12:18 AM2020-07-02T00:18:27+5:302020-07-02T00:18:40+5:30

चीनने या भागात आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या अनेक द्वीपांवर लष्करी तळ बनवले आहेत. तसेच खनिज, तेल व इतर नैसर्गिक संसाधनांचे भांडार जागतिक व्यापारासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

Will increase security capabilities to deter China; Australia to invest in defense | चीनला रोखण्यासाठी सुरक्षा सामर्थ्य वाढवणार; ऑस्ट्रेलिया संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करणार

चीनला रोखण्यासाठी सुरक्षा सामर्थ्य वाढवणार; ऑस्ट्रेलिया संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करणार

Next

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आपले सुरक्षा सामर्थ्य वाढवणार असून, आगामी दशकभरात संरक्षण क्षेत्राच्या अत्याधुनिकतेसाठी २७० अब्ज डॉलर्स गुंतवणूक करणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केली आहे.

रणनीतिक रूपाने महत्त्वपूर्ण असलेल्या हिंद-प्रशांत क्षेत्रात चीनच्या आक्रमक पवित्र्यानंतर सर्व प्रकारच्या आक्रमणांना रोखण्यासाठी, तसेच प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. हिंद-प्रशांत क्षेत्रात चीनचे वाढते सैन्य व आर्थिक प्रभाव विविध देशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

चीनने या भागात आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या अनेक द्वीपांवर लष्करी तळ बनवले आहेत. तसेच खनिज, तेल व इतर नैसर्गिक संसाधनांचे भांडार जागतिक व्यापारासाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला आहे. मॉरिसन यांनी म्हटले आहे की, हिंद-प्रशांत क्षेत्रात उभ्या राहणाऱ्या आव्हानांचा अर्थ आहे की, आम्हाला आमची पद्धत बदलावी लागेल. जेणेकरून आमच्यावर परिणाम करणाºया या कारवाया रोखण्यासाठी आम्हाला पावले उचलावी लागतील. कोरोनाबरोबर लढताना आम्हाला कोरोनानंतरच्या जगाबरोबर जगण्यासाठी तयार राहिले पाहिजे. यात अधिक गरिबी, धोका व अनिश्चितता असण्याची शक्यता आहे. आम्हाला संभाव्य धोक्यासाठी तयार राहिले पाहिजे. चीन व अमेरिकेमध्ये रणनीतिक प्रतिस्पर्धा वाढण्याचा अर्थ असेल अत्याधिक तणाव, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Will increase security capabilities to deter China; Australia to invest in defense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.