भारतासोबत नव्याने मैत्रीची पाकिस्तानच्या पंतप्रधानांची इच्छा, काश्मीरबाबत सुचवला असा तोडगा, मोदी मान्य करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 05:22 PM2022-08-19T17:22:27+5:302022-08-19T17:23:16+5:30

India Pakistan Relation: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत शांततापूर्ण आणि मैत्रिपूर्ण संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काश्मीर प्रश्न सुटण्याची शक्यताही व्यक्त केली.

Will Modi accept Pakistan's Prime Minister's desire for new friendship with India, proposed solution to Kashmir? | भारतासोबत नव्याने मैत्रीची पाकिस्तानच्या पंतप्रधानांची इच्छा, काश्मीरबाबत सुचवला असा तोडगा, मोदी मान्य करणार?

भारतासोबत नव्याने मैत्रीची पाकिस्तानच्या पंतप्रधानांची इच्छा, काश्मीरबाबत सुचवला असा तोडगा, मोदी मान्य करणार?

Next

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत शांततापूर्ण आणि मैत्रिपूर्ण संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच काश्मीर प्रश्न सुटण्याची शक्यताही व्यक्त केली. एका मीडिया रिपोर्टनुसार शाहबाज शरीफ यांनी समानता, न्याय आणि परस्पर सन्मानाचे तत्त्व आणि काश्मीर प्रश्न सोडवण्याच्या आधारावर भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

शाहबाज शरीफ यांनी आंतरराष्ट्रीय समुहाला दक्षिण आशियामध्ये स्थायी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सुविधाजनक भूमिका बजावण्याची मागणी केली.  पाकिस्तानमधील अग्रगण्य अशा डॉन वृत्तपत्राने पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या हवाल्याने सांगितले की, शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये नवनियुक्त ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त नील हॉकिन्स यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हे मत व्यक्त केले.

शाहबाज शरीफ यांनी सांगितले की, पाकिस्तान समानता, न्याय आणि परस्पर सन्मानाच्या सिद्धांताच्या आधारावर भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करू इच्छितो. या संदर्भात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्ताव आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार जम्मू-काश्मीर विवादावर न्यायसंगत आणि  शांततापूर्ण तोडगा निघणे अपरिहार्य आहे.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, आंतरराष्ट्रीय समुदायाला या संदर्भात एका सहाय्यकाची भूमिका बजावावी लागेल. कारण हा दक्षिण आशियामध्ये स्थायी शांतता आणि स्थिरतेसाठी आवश्यक आहे. दरम्यान, दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, असे भारताने पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे. दहशतवाद आणि शत्रुत्वमुक्त वातावरण बनवण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य आहे आणि कायम राहील, असे भारताने पाकिस्तानला वारंवार ठणकावून सांगितले आहे.  
 

Web Title: Will Modi accept Pakistan's Prime Minister's desire for new friendship with India, proposed solution to Kashmir?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.