सुनावणी लांबणीवर टाकणार नाही : पाक

By Admin | Published: June 17, 2017 12:36 AM2017-06-17T00:36:31+5:302017-06-17T00:36:31+5:30

कुलभूषण जाधव प्रकरणाचे कामकाज डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकावे ही भारताची विनंती आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) फेटाळली असल्याचा दावा पाकिस्तानने शुक्रवारी येथे केला.

Will not postpone hearing: Pak | सुनावणी लांबणीवर टाकणार नाही : पाक

सुनावणी लांबणीवर टाकणार नाही : पाक

googlenewsNext

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव प्रकरणाचे कामकाज डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकावे ही भारताची विनंती आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) फेटाळली असल्याचा दावा पाकिस्तानने शुक्रवारी येथे केला.
आयसीजेने भारताला आपले म्हणणे १३ सप्टेंबरपर्यत सादर करण्याचा आदेश दिल्याची माहिती पाकिस्तानला नेदरलँडसमधील त्याच्या वकिलातीकडून समजली आहे, असे वृत्त ‘डॉन’ दैनिकाने दिले. त्यासाठी वृत्तात अ‍ॅटर्नी जनरल अश्तार औसाफ अली यांचा हवाला देण्यात आला आहे. पाकिस्तानात हेरगिरी केल्याच्या आरोपावरून जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने गेल्या एप्रिल महिन्यात फाशीची शिक्षा सुनावली आहे. आयसीजे आपल्या निर्णयाची माहिती आम्हाला पत्राद्वारे कळवली आहे, असे अली म्हणाले.

Web Title: Will not postpone hearing: Pak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.