Afghanistan: आता अफगाणिस्तान सरकारसोबत काम करणार; बायडन यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 08:09 AM2021-09-01T08:09:06+5:302021-09-01T08:09:52+5:30

Joe Biden on Afghanistan Exit: काबूल विमानतळावर होणारे जिवघेणे हल्ले पाहता अमेरिकेने एक दिवस आधीच काबूलवरून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. तालिबानने त्यांना 31 ऑगस्टची मुदत दिली होती.

Will now work with the Afghan government; Joe Biden's announcement | Afghanistan: आता अफगाणिस्तान सरकारसोबत काम करणार; बायडन यांची घोषणा

Afghanistan: आता अफगाणिस्तान सरकारसोबत काम करणार; बायडन यांची घोषणा

Next

अमेरिकेने डेडलाईनच्या 24 तास आधीच अफगाणिस्तान (Afghanistan) सोडला. मात्र, काबूल विमानतळावर होणारे जिवघेणे हल्ले पाहता अमेरिकेने एक दिवस आधीच काबूलवरून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. तालिबानने त्यांना 31 ऑगस्टची मुदत दिली होती. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी आज देशाला संबोधित केले. तसेच आपली मोहिम यशस्वी ठरल्याची घोषणा केली. (“It was time to end this war,” Joe Biden.)

आम्ही अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षे शांतता राखली. आम्ही जे काम केले आहे, ते दुसरा कोणी करू शकत नाही. तालिबान असताना तेथून जे लोक बाहेर पडू इच्छित होते, आम्ही त्यांना बाहेर काढले आहे. आम्ही १ लाख लोकांना बाहेर काढले. यावेळी काबूल विमानतळाची सुरक्षाही पाहिली गेली. तालिबानला शस्त्रसंधी कराय़ला लावली, असा दावा बायडन यानी केला आहे. 

आता आम्ही अफगाण आघाडीसोबत काम करू. अफगाणिस्तानची सत्ता आता तालिबानकडे आहे. तिथे आता हजारो लोकांना पाठवू शकत नाही. अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर हा आमच्या किंवा अन्य कोणत्याही देशाविरोधात दहशतवादी कारवायांसाठी वापर केला जाऊ नये. आम्हाला जगाला सुरक्षित ठेवायचे आहे. सोमालिया आणि अन्य देशांची परिस्थिती तुम्ही पाहिली आहे. अफगाणिस्तानमधून बाहेर पडणे हे एक रणनितीचा हिस्सा आहे. अमेरिकन सैन्याच्या मदतीशिवाय ते आता कसे उभे राहतात, मजबूत होतात ते येणारा काळ सांगेल, असे बायडेन म्हणाले. 

अद्याप आपले काम पूर्ण झालेले नाही. दोन दशकांपूर्वी त्यावेळच्या परिस्थितीवरून निर्णय घेतला होता. आपल्याला चीनशी स्पर्धा करवी लागत आहे. चीन आणि रशिया प्रतिस्पर्धेत पुढे जात आहेत. आपली मोहिम स्पष्ट आणि मूळ सिद्धांत हा अमेरिकेच्या हिताचा असला पाहिजे. आता अफगाणिस्तानच्या स्त्रिया, मुलांचा अधिकार हा हिंसेने नाही तर कूटनीतीने मानवाधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू, असेही बाय़डन म्हणले. 

Web Title: Will now work with the Afghan government; Joe Biden's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.