पाकला एफ-१६ मिळणार?
By admin | Published: January 20, 2016 03:20 AM2016-01-20T03:20:22+5:302016-01-20T03:20:22+5:30
पाकिस्तानला ८ एफ-१६ विमाने देण्यात भारताने अडथळे आणण्याचा प्रयत्न करूनही अमेरिका ती विमाने देण्यास तयार असल्याचा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी केला आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानला ८ एफ-१६ विमाने देण्यात भारताने अडथळे आणण्याचा प्रयत्न करूनही अमेरिका ती विमाने देण्यास तयार असल्याचा दावा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी केला आहे.
अमेरिकी काँग्रेसमध्ये रिपब्लिकन सदस्यांचे बहुमत आहे. त्यांनी पाकला एफ-१६ विमाने देण्यास विरोध करीत याबाबतचा प्रस्ताव रोखून धरला होता. या पार्श्वभूमीवर असीफ यांचे हे विधान आले आहे. असीफ म्हणाले की, अमेरिकेकडून पाकला विक्री केल्या जाणाऱ्या विमानांना भारताने विरोध करून त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. माजी राजदूत हुसैन हक्कानी यांनी तीच भूमिका घेतली होती. मात्र ही ८ एफ-१६ विमाने पाकला देण्यास अमेरिका वचनबद्ध आहे. अतिरेक्यांविरुद्ध ठोस कारवाई करण्यास पाकिस्तान अनुच्छुक आहे, त्यामुळे अमेरिकी काँग्रेसमध्ये पाकिस्तानविरुद्ध भावना व्यक्त करण्यात येत आहेत. (वृत्तसंस्था)