बांगलादेशमधील हिंदू तसेच अन्य अल्पसंख्याकांचे संरक्षण करणार: युनूस यांचा माेदींना फाेन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 07:50 AM2024-08-17T07:50:17+5:302024-08-17T07:51:37+5:30

ढाका : बांगलादेशातील हिंदू व इतर अल्पसंख्याक समुदायांचे संरक्षण करण्याचे आश्वासन बांगलादेशमधील हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी ...

Will protect Hindus and other minorities in Bangladesh: Yunus's appeal to the Medes | बांगलादेशमधील हिंदू तसेच अन्य अल्पसंख्याकांचे संरक्षण करणार: युनूस यांचा माेदींना फाेन

बांगलादेशमधील हिंदू तसेच अन्य अल्पसंख्याकांचे संरक्षण करणार: युनूस यांचा माेदींना फाेन

ढाका : बांगलादेशातील हिंदू व इतर अल्पसंख्याक समुदायांचे संरक्षण करण्याचे आश्वासन बांगलादेशमधील हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना शुक्रवारी दूरध्वनी करून दिले. बांगलादेशमध्ये गेल्या काही आठवड्यांत झालेल्या हिंसक निदर्शनांत तेथील अल्पसंख्याकांची घरे, मंदिरे, दुकाने आदींवर हल्ले करण्याचे प्रकार घडले होते. त्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली होती. 

बांगलादेशमध्ये लोकशाही पुन्हा प्रस्थापित व्हावी, तिथे शांतता नांदावी, अशी आशा मोदी यांनी युनूस यांच्याकडे व्यक्त केली. बांगलादेशमध्ये हिंदू व अन्य अल्पसंख्याकांवर गेल्या काही आठवड्यांत झालेल्या हल्ल्यांबाबत मोदी यांनी नुकतीच तीव्र चिंता व्यक्त केली होती. 

भारतीय पत्रकारांना भेटीचे आमंत्रण

बांगलादेशमधील स्थिती नियंत्रणात आणली असल्याचा दावा मुहम्मद युनूस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलताना केला. बांगलादेशात अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांसंदर्भात अतिरंजित स्वरुपाच्या बातम्या प्रसारित झाल्या. त्यामुळे मी भारतीय पत्रकारांना बांगलादेशमध्ये येण्याचे आमंत्रण देतो, असेही युनूस यांनी म्हटले आहे. 

Web Title: Will protect Hindus and other minorities in Bangladesh: Yunus's appeal to the Medes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.