रशिया, इराण, उत्तर कोरियावर निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:23 AM2017-07-27T03:23:11+5:302017-07-27T03:23:16+5:30
अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांचे हित धोक्यात आणल्याचा आणि भांडखोर कृत्ये केल्याचा आरोप करीत अमेरिकेने रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत.
वॉशिंग्टन : अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांचे हित धोक्यात आणल्याचा आणि भांडखोर कृत्ये केल्याचा आरोप करीत अमेरिकेने रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध लादले आहेत. मात्र या निर्बंधांचे स्वरूप स्पष्ट झालेले नाही. हाऊस आॅफ रिप्रेंझेंटेटिव्हजने या निर्बंधांचे विधेयक ४१९-३ अशा मताने संमत केले.
हे निर्बंध अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लुडबुड केल्याबद्दल रशियावर आणि त्याने युक्रेन व सीरियावर केलेल्या लष्करी आक्रमणाबद्दल आहेत. दहशतवादाला सतत पाठिंबा दिल्याबद्दल इराणवर निर्बंध घातले आहेत. रशिया, इराण आणि उत्तर कोरिया यांच्यामुळे अमेरिकेच्या हितांना बाधा आली असून ते अमेरिकेच्या शेजाºयांना अस्थिर करीत आहेत, असे परराष्ट्र कामकाज समितीचे अध्यक्ष एड रॉयस म्हणाले. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रशियाच्या कथित लुडबुडीच्या चौकशीबाबत अॅटर्नी जनरल जेफ सेशन्स यांची भूमिका मला मान्य नसली तरी त्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्याचा माझा विचार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
ओबामांवर टीका
युद्धाने गंभीर अवस्थेला पोहोचलेल्या सीरियात मानवतेवर भयंकर अत्याचार होत असताना पुरेशी कृती न केल्याबद्दल ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना फटकारले. ओबामा यांनी रेषेपलीकडे जाऊन जे करायला हवे होते ते केले असते तर आज सीरियामध्ये तसेच रशिया किंवा इराण जे दिसत आहे, ते दिसले नसते, असा माझा विश्वास आहे, असे ते म्हणाले.
संबंध बिघडतील
रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंधात सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना मोडून टाकण्याचे
अमेरिकेने लादलेले नवे निर्बंध हे ‘गंभीर पाऊल’ असल्याचे रशियाचे उप परराष्ट्र मंत्री सर्जी रॅब्कोव्ह यांनी सरकारी वृत्तसंस्था ‘तास’ला सांगितले. उभय देशांतील संबंध सामान्य बनवण्याची शक्यता नाहीशी करणारे हे निर्बंधांचे विधेयक आहे, असे ते म्हणाले.