रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 09:41 AM2024-11-20T09:41:28+5:302024-11-20T09:42:23+5:30
जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांची मॉस्को येथे भेट घेतली होती. त्यावेळी पुतिन यांना त्यांनी भारत भेटीचे निमंत्रण दिले होते.
नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारताचा दौरा करण्याची शक्यता आहे. ही माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. पुतीन यांच्या भारत दौऱ्याची तारीख किंवा अन्य तपशील अद्याप ठरलेला नाही.
जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांची मॉस्को येथे भेट घेतली होती. त्यावेळी पुतिन यांना त्यांनी भारत भेटीचे निमंत्रण दिले होते. ब्रिक्स परिषदेसाठी मोदी हे गेल्या महिन्यात रशियातील कझान शहरात गेले होते. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी याबाबत सांगितले की, पुतिन यांच्या दौऱ्याचा तपशील दाेन्ही देश लवकरच ठरविणार आहेत.
‘अमेरिकेमुळे परिस्थिती आणखी चिघळेल’
अमेरिकेने दिलेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा रशियावर मारा करण्यास युक्रेनला संमती देण्याच्या जो बायडेन यांनी घेतलेल्या निर्णयामुळे परिस्थिती आणखी चिघळेल, असे पेस्कोव्ह म्हणाले.