श्रीलंकेच्या राजकारणात सिरिसेना पुन्हा येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 04:39 AM2019-11-25T04:39:08+5:302019-11-25T04:48:10+5:30

श्रीलंकेचे माजी अध्यक्ष मैथरीपाला सिरिसेना हे पुन्हा संसदेत यायच्या प्रयत्नात असल्याचे त्यांच्या श्रीलंका फ्रीडम पार्टीतून हकालपट्टी झालेले वरिष्ठ संसद सदस्य ए. फौजी यांनी रविवारी सांगितले.

 Will Sirisena re-enter Sri Lankan politics? | श्रीलंकेच्या राजकारणात सिरिसेना पुन्हा येणार?

श्रीलंकेच्या राजकारणात सिरिसेना पुन्हा येणार?

Next

कोलंबो : श्रीलंकेचे माजी अध्यक्ष मैथरीपाला सिरिसेना हे पुन्हा संसदेत यायच्या प्रयत्नात असल्याचे त्यांच्या श्रीलंका फ्रीडम पार्टीतून हकालपट्टी झालेले वरिष्ठ संसद सदस्य ए. फौजी यांनी रविवारी सांगितले. सिरिसेना हे श्रीलंका फ्रीडम पार्टीचे अध्यक्ष आहेत. फौजी यांची सिरिसेना यांनी संसदेचा नेता म्हणून नियुक्ती केली होती. पक्षाने मला काढून टाकले कारण माझ्या जागी सिरिसेना यांची नियुक्ती करता येईल, असा दावा फौजी यांनी केला. श्रीलंकेतील नियमाप्रमाणे संसदेवर निवडून गेलेल्या सदस्याला राजीनामा देऊन बाहेर पडता येते. त्याला त्या पदावरून हाकलून लावता येत नाही.

श्रीलंकेत अध्यक्षपदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गोताभाया राजपक्ष हे विजयी झाले. २०१५ मध्ये अध्यक्ष असलेले सिरिसेना मात्र यावेळी उभे नव्हते. निवडणुकीत सिरिसेना तटस्थ राहिले. परंतु त्यांच्या पक्षाने राजपक्ष यांना पाठिंबा दिला होता. तथापि, फौजी यांनी राजपक्ष यांचे विरोधक युनायटेड नॅशनल पार्टीचे उमेदवार सजिथ प्रेमदासा यांना पाठिंबा दिला होता.

Web Title:  Will Sirisena re-enter Sri Lankan politics?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.