इस्रायल-हमास युद्ध आणखी भडकणार? आम्हीही युद्धात उतरू, इराणने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 06:27 AM2023-10-17T06:27:06+5:302023-10-17T06:27:22+5:30

दहा लाख नागरिकांचे गाझातून पलायन, हजाराे लाेकांचा मृत्यू

Will the Israel-Hamas war flare up further? We will also go to war, Iran warned | इस्रायल-हमास युद्ध आणखी भडकणार? आम्हीही युद्धात उतरू, इराणने दिला इशारा

इस्रायल-हमास युद्ध आणखी भडकणार? आम्हीही युद्धात उतरू, इराणने दिला इशारा

जेरुसलेम : लोकांची निर्दयीपणे कत्तल केल्याचा बदला म्हणून हमासचे प्रमुख केंद्र असलेल्या गाझा शहराला संपविण्यावर  इस्रायल ठाम आहे. गाझा शहरातील लोकांना शहर सोडण्याचे आदेश दिल्यानंतर दहा लाखांहून अधिक लोकांनी आपली इस्रायलने गाझा शहरात सैन्य घुसविल्यास आम्हीही युद्धात उतरू शकतो, असा इशारा इराणने दिला आहे. त्यामुळे युद्ध आणखी भडकण्याची भीती आहे.

इस्रायली सैन्य गाझा सीमेवर असून, त्यांच्या मदतीला अमेरिकेच्या युद्धनौका आहेत. सध्या हमास आणि इस्रायलमध्ये दोन्ही बाजूंनी बॉम्बवर्षाव सुरू आहे. इस्रायली सैन्याने ब्लू लाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीमेवर असलेल्या हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ला करत ती ठिकाणे नष्ट केली. (वृत्तसंस्था)

पॅलेस्टिनींना प्रवेशबंदी करणाऱ्या देशांवर निक्की हॅले यांची टीका
nइस्रायल जमिनीवरून करणार असलेल्या चढाईपासून आपला जीव वाचविण्यासाठी असंख्य पॅलेस्टिनी नागरिक सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याकरिता शेजारी अरब देशांत जाऊ पाहात आहेत. 
nपण, त्यांना इजिप्त, लेबनॉन, जॉर्डन आदी देशांनी प्रवेश नाकारला. त्याबाबत अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या निक्की हॅले यांनी अरब देशांवर कडक टीका केली. 
nत्या म्हणाल्या की, पॅलेस्टाइनमधील लोकांच्या भवितव्याबद्दल अरब देशांना चिंता वाटत नाही. 

आज नेमके 
काय झाले? 
nगाझातील संयुक्त राष्ट्राच्या निर्वासितांच्या छावणीतील पाणी संपले आहे. 
nजनरेटरचे इंधन संपल्यास मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होण्याची भीती
nअमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन  इस्रायलच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता
nगाझा शहरात सैन्य घुसविणे इस्रायलची चुकीची कृती : अमेरिका

हल्ले थांबवा, ओलिसांना सोडू
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले करण्याची मोहीम थांबविल्यास हमास त्यांच्या ताब्यात असलेल्या सुमारे २०० ओलिसांना सोडण्यास तयार आहे. दहशतवादी गटाने अशी ऑफर दिल्याचे मान्य केलेले नाही. 

युद्धामुळे द्वेष, केली सहा वर्षीय मुलाची हत्या
७२ वर्षीय वृद्धाने सहा वर्षांच्या मुस्लीम मुलाची चाकूने हत्या केली तसेच त्याच्या  ३२ वर्षीय आईवर चाकूने वार करत गंभीर जखमी  केल्याचा प्रकार अमेरिकेतील इलिनॉयमध्ये घडला आहे. याप्रकरणी आरोपीवर  द्वेषाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Will the Israel-Hamas war flare up further? We will also go to war, Iran warned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.