युद्ध पेटणार...? ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराण भडकला, तैनात केले मिसाइल; अंडरग्राउंड मिसाइल सिटी अॅक्टिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:08 IST2025-03-31T11:06:44+5:302025-03-31T11:08:41+5:30
खरे तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला अणु करार न केल्यास बॉम्बिंग करण्याची धमकी दिली होती.

युद्ध पेटणार...? ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराण भडकला, तैनात केले मिसाइल; अंडरग्राउंड मिसाइल सिटी अॅक्टिव्ह
तेहरान: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. या तणावाचे रुपांतर केव्हाही युद्धात होऊ शकते, अशी शक्यता माध्यमांतून व्यक्त केली जात आहे. यातच अमेरिकेने हल्ल्याची धमकी दिल्यानंतर, इराणही अमेरिकेला भिडण्याच्या पावित्र्यात दिसत आहे. इराणच्या सैन्याने अमेरिकेच्या कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मिसाइल्स तैनात केले आहेत. तेहरान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने अंडरग्राउंड मिसाइल सिटीमध्ये लॉन्चर्सवर मिसाइल्स लोड केले असून ते लॉन्चसाठी तयार आहेत. याशिवाय,"पँडोरा बॉक्स ओपन केल्यास अमेरिकन सरकार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल," अशी 'X' पोस्ट देखील तेहरान टाइम्सने केली आहे.
ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर -
खरे तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला अणु करार न केल्यास बॉम्बिंग करण्याची धमकी दिली होती. यानंतर, इराणने मिसाइल्स तैनात केले आहेत. याशिवाय, इराणने गेल्या आठवड्यातच वॉशिंग्टनसोबत थेट चर्चा करण्याचा टम्प यांचा प्रस्तावही फेटाळला आहे. यानंतर एनबीसी न्यूजला टेलीफोनवर दिलेल्या मुलाखतीत, अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र त्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली नही.
जर इर करार केला नाही, तर... -
टेलिफोनवर दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले होते, "जर त्यांनी करार केला नाही, तर बॉम्बिंग होईल. त्यांनी कधीही बघितली नसेल, अशी ही बॉम्बिंग असेल. एवढेच नाही तर, त्यांनी कुठलाही करा केला नाही तर, आपण त्यांच्यावर दुय्यम शुल्क लादू, जसे चार वर्षांपूर्वी लादण्यात आले होते," असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.