चॅटजीपीटीच्या मदतीने दृष्टिहीन युवक पोहोचला स्टेडियमवर; जपानमध्ये प्रयोग यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 11:26 AM2024-07-14T11:26:51+5:302024-07-14T11:42:13+5:30
एका चाचणीनंतर जपानमधील एक दृष्टीने दिव्यांग २६ वर्षांचा खेळाडू माशिरो खेळण्यासाठी एकट्याने स्टेडियमपर्यंत येऊ शकला.
टोकियो : चॅटजीपीटी आता साऱ्यांचा जणू मित्र बनला आहे. याच्या मदतीने लोक अधिक स्मार्टपणे, वेगाने आणि अचूकपणे काम करीत आहेत. हे तंत्रज्ञान आता केवळ प्रश्नांची उत्तरे देण्यापुरते मर्यादित उरलेले नाही. याच्या मदतीने डोळ्यांनी दिव्यांग दृष्टिहीन व्यक्ती इच्छित ठिकाणी पोहोचू लागली आहे.
एका चाचणीनंतर जपानमधील एक दृष्टीने दिव्यांग २६ वर्षांचा खेळाडू माशिरो खेळण्यासाठी एकट्याने स्टेडियमपर्यंत येऊ शकला. या कामासाठी त्याला आतापर्यंत इतरांवर अवलंबून राहावे लागत असे; पण आता चॅटजीपीटीमुळे तो स्वावलंबी झाला आहे. माशिरोला मायक्रोफथाल्मोस हा आजार झाला आहे.
एआय तंत्रज्ञान कसे ठरते उपयोगी?
ज्या व्यक्तींना श्रवणाच्या क्षमतेमध्ये काही समस्या असतात त्यांना एआय़ स्पीच टू टेक्स्ट या फीचरचा वापर करता येतो.
शिक्षण घेण्यात अडचण असलेल्यांसाठी चॅटबॅट रेजुमे बनवून देऊ शकते.
दृष्टीविषयी विकार असलेल्यांना सीईंग एआय, एनव्हिजन आय, टॅपटॅपसी, आदी फीचर्स उपलब्ध आहेत. केवळ एखादा फोटो दिला तरी त्यात नेमके काय काय आहे, याचे वर्णन केले जाऊ शकते.
माशिरो किती वेळात पोहोचला?
हातातील छडीचा आधार घेत घेत माशिरो स्टेडियमकडे निघाला होता. या प्रवासात प्रत्येकवळी तो टजीपीटीला रस्ता विचारत होता. हा संवाद साधण्यासाठी त्याने एका कानात हेडफोन लावला होता; तर दुसऱ्या कानाने इतर हालचाली तो टिपू शकतो.
त्याने सुरुवातीला चॅटजीपीटीला सांगितले, दृष्टीहीन असल्याने मला अजिबात दिसू शकत ही. त्यामुळे अशा लोकांना मार्गदर्शन केले जाते असते त्याप्रमाणे मला सूचना दिल्या जाव्यात.
त्यावर चॅटजीपीटीने सांगितले की, जसजसा तू स्टेडियमजवळ जाशील तसा गोंगाट, कोलाहल अधिक ऐकू येईल. या रस्त्याने सामान्य माणसाला पोहोचण्यासाठी २० मिनिटे लागतात; पण माशिरोला यासाठी चारपट अधिक वेळ लागला.
एआयमुळे लोकांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करणे शक्य होणार आहे. यामुळे सध्या उपलब्ध असलेली उपकरणे अधिक वेगवान आणि दर्जेदार बनत आहेत. एआयमध्ये अफाट शक्ती आहे. यामुळे अनेक लोकांचा सशक्त बनण्याचा आणि आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे - प्रो. यंगजूनचो, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन