पोलिसांना कळवल्याशिवाय सेक्स करण्यावर 'या' देशात बंदी
By admin | Published: October 26, 2016 08:08 PM2016-10-26T20:08:29+5:302016-10-26T20:08:29+5:30
इंग्लंडमधल्या वेरिंगटन चेशियर या भागात रात्री 9 वाजल्यानंतर लिंगपिसाटांना पबमध्ये जाण्यापासून बंदी घालण्यात आली आहे
ऑनलाइन लोकमत
इंग्लंड, दि. 26 - इंग्लंडमधल्या वेरिंगटन चेशियर या भागात रात्री 9 वाजल्यानंतर लिंगपिसाटांना पबमध्ये जाण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. अशा व्यक्तींनी सेक्स करण्याआधी स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी, असे आदेश चेशियर मॅजिस्ट्रेट कोर्टानं दिले आहेत, असं वृत्त टेलिग्राफनं दिलं आहे.
23 वर्षीय निकोलस क्रावशॉव याच्या बलात्काराच्या प्रकरणांवर सुनावणी करताना चेशियर मॅजिस्ट्रेट कोर्टानं हे निर्देश दिले आहेत. निकोलसनं 2015पासून आतापर्यंत 6 वेळा बलात्कार, दोनदा लैंगिक छळ, 8 महिलांवर प्राणघातक हल्ले केले आहेत. अशा व्यक्ती समाजासाठी घातक असल्याचीही टिपण्णी कोर्टानं केली आहे. चेशियर पोलिसांनी निकोलस हा लिंगपिसाट आहे, अशी माहिती कोर्टात दिली आहे.
निकोलास विरोधात एलिझाबेथ या महिलेनं कोर्टात याचिका दाखल केली आहे. एलिझाबेथ यांनी कोर्टाला सांगितलं की, निकोलस यानं आतापर्यंत 11 महिलांवर अत्याचार केले आहेत. मात्र त्यापैकी 6 महिलांनीच तक्रार केली आहे. तो नाइटक्लबमधल्या शौचालयात मुली आणि महिलांवर बलात्कार करत असे. त्याअनुषंगानेच कोर्टानं सार्वजनिक ठिकाणी आणि संवेदनशील भागात रात्री 9 ते सकाळी 6 वाजताच्या दरम्यान लिंगपिसाटांना सेक्स करायचा असल्यास त्यांनी आधी पोलिसांना कळवावं आणि त्यानंतरच सेक्स करण्याचा विचार करावा, असं म्हटलं आहे.