तुरुंगातील कैद्यांना पत्नी पाठवत होत्या अश्लील आणि सेक्सी फोटो, समोर आलं असं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 04:50 PM2023-02-07T16:50:09+5:302023-02-07T16:50:41+5:30

Jail News: तुरुंगातील नियम हे बहुतांशी कडक असतात. मात्र काही महिलांनी तुरुंगातील हे कडक नियम धाब्यावर बसवले आहेत. या महिलांनी तुरुंगात बंद असलेल्या कैदी पतींना आपले अश्लील आणि सेक्सी फोटो पाठवले.

Wives were sending obscene and sexy photos to prison inmates, the reason came to light | तुरुंगातील कैद्यांना पत्नी पाठवत होत्या अश्लील आणि सेक्सी फोटो, समोर आलं असं कारण 

तुरुंगातील कैद्यांना पत्नी पाठवत होत्या अश्लील आणि सेक्सी फोटो, समोर आलं असं कारण 

googlenewsNext

तुरुंगातील नियम हे बहुतांशी कडक असतात. मात्र काही महिलांनी तुरुंगातील हे कडक नियम धाब्यावर बसवले आहेत. या महिलांनी तुरुंगात बंद असलेल्या कैदी पतींना आपले अश्लील आणि सेक्सी फोटो पाठवले. या प्रकरणाचा उलगडा झाला तेव्हा तुरुंग प्रशासनाला धक्का बसला आहे. हल्लीच फेसबूकवरून काही लोक बोलत असताना या प्रकरणाचा उलगडा झाला.

हे प्रकरण ब्रिटनमधील आहे. या महिलांनी तुरुंगात असलेल्या त्यांच्या पतींचे वकील बनून त्यांना अश्लील फोटो पाठवले. तुरुंगामध्ये जी पाकिटं कायदेशीर पत्रव्यवहारासाठी पाठवली जातात. ती तुरुंगाधिकारी उघडू शकत नाही, कारण त्यात गोपनीय सूचना असतात, या नियमाची माहिती या महिलांना होती. त्यांनी त्याचाच फायदा घेतला. 

याबाबत प्रसारित झालेल्या वृत्तामध्ये एका सूत्राने सांगितले की, पत्नींचे इंटिमेट फोटो पाहून कैदी खूश होत असत. मात्र हल्लीच या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल झाली आहे. काही लोक फेसबूकवर चर्चा करत असताना याचा उलगडा झाला आहे. काही तुरुंगातून असे अश्लील फोटो त्वरित हटवले जातात. तर काही ठिकाणी याबाबत काहीशी ढिलाई बाळगली जाते. 

यादरम्यान, एका महिलेने लिहिले की, मी दर महिन्याला अनेक प्रकारचे फोटो पाठवत असे, त्यांना प्रत्येक फोटो मिळत असे. मी एक महिन्याला सुमारे ५० फोटो पाठवले.  या प्रकरणी तुरुंग प्रवक्त्यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सांगितले की फेक कागदपत्रे पाठवणं हा गुन्हा आहे. जर कुणी असं करत असेल तर आम्ही त्याची पोलिसांना माहिती देतो.  

Web Title: Wives were sending obscene and sexy photos to prison inmates, the reason came to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.