बॉयफ्रेन्डसोबत केला रोमान्स, भडकलेल्या गर्लफ्रेन्डने गोळी झाडून केली तरूणीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 10:53 AM2022-05-24T10:53:43+5:302022-05-24T10:55:09+5:30
US Crime News : २५ वर्षीय प्रोफेशनल सायकलिस्ट एन्ना मोरिया विल्सनची डेड बॉडी ११ मे रोजी अमेरिकेच्या ऑस्टिन शहरातील एका घरात सापडली.
US Crime News : एक तरूणीला समजलं की, तिच्या बॉयफ्रेन्डचं अफेअर दुसऱ्या एका तरूणीसोबत सुरू आहे. अशात तरूणीने दुसऱ्या तरूणीला आधी धमकी देत बॉयफ्रेन्डपासून दूर राहण्यास सांगितलं. नंतर तिने गोळी झाडून दुसऱ्या तरूणीची हत्या केला. पोलिसांनुसार, तरूणाची पहिली गर्लफ्रेन्ड हत्या करून फरार झाली आहे.
२५ वर्षीय प्रोफेशनल सायकलिस्ट एन्ना मोरिया विल्सनची डेड बॉडी ११ मे रोजी अमेरिकेच्या ऑस्टिन शहरातील एका घरात सापडली. ती बाइक रेसमध्ये सहभागी होण्यासाठी सॅन फ्रान्सिस्कोहून तिथे पोहोचली होती.
पोलिसांनी चौकशी अधिकाऱ्यांना सांगितलं की, ३४ वर्षीय योगी कॅटलिन आर्मस्ट्रांगला जेव्हा समजलं की, तिचा लिव-इन सायकलिस्ट बॉयफ्रेन्ड कॉलिन स्ट्रिकलॅंडने विल्सनसोबत २०२२ जानेवारीमध्ये रोमान्स केला होता, त्यामुळे ती रागावलेली होती. योगी असंही म्हणाली होती की, ती इतकी रागात आहे की, तिला विल्सनची हत्या करायची आहे. योगी आणि कॉलिनने त्यावेळी रिलेशनशिपमधून ब्रेक घेतला होता.
कॉलिनने पोलिसांसमोर हे स्वीकारलं आहे की, तो जानेवारी २०२२ मध्ये थोड्या दिवसांसाठी विल्सनला डेट करत होता. केसच्या अॅफिडेविटनुसार, कॉलिन म्हणाला की, त्याने विल्सनसोबत लॉंग-टर्म रोमान्स नाही केला आणि लगेच सगळं काही संपवलं होतं.
विल्सनच्या परिवाराने KXAN चॅनलला स्टेटमेंट जारी करून सांगितलं की, आम्हाला वाटतं की, ही गोष्ट स्पष्ट केली जावी की, मृत्यूवेळी जे लोक विल्सनचे जवळचे होते त्यांना हे माहीत होतं की, ती कुणासोबतही रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये नव्हती. एका पोलीस रिपोर्टनुसार, मृत्यूच्या काही वेळाआधी विल्सन लोकल पुलमध्ये कॉलिनसोबत स्वीमिंग करत होती.
आता याप्रकरणी पोलीस योगीचा शोध घेत आहेत. ती फरार झाली आहे. योगीवरच विल्सनच्या हत्येचा आरोप आहे आणि असंही सांगितलं जात आहे की, घटनेआधी तिने विल्सनला धमकीही दिली होती. आतापर्यंतच्या पुराव्यानुसार आणि चौकशीनुसार योगीनेच विल्सनची हत्या केली आहे.