अरेरे... घात झाला ! नवऱ्याचं जुनं पत्र सापडलं, मग चिडलेल्या बायकोने केलं असं काही की...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 10:44 AM2024-02-10T10:44:19+5:302024-02-10T10:54:27+5:30
एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
फ्लोरिडामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बर्था याल्टर या 71 वर्षीय महिलेने 60 वर्षांपूर्वीच्या एका गोष्टीवरून आपल्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याचा गंभीर आरोप आहे. महिलेला एका जुन्या पत्रावरून कळलं होतं की, तिच्या पतीचं 60 वर्षांपूर्वी एका तुर्की महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, या दोघांच्या लग्नाला 52 वर्षे झाली आहेत. पतीचं हे अफेअर लग्नाच्या 8 वर्षांपूर्वीचं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
हे सत्य समजल्यानंतर बर्था याल्टर इतकी संतप्त झाली की तिने आपल्या पतीवर गंभीर हल्ला केला. तिने आपल्या वृद्ध पतीचा चेहरा उशीने दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला घरी करण्यात आला. यामध्ये पतीला दुखापत झाली आहे. त्याच्या शरीरावर जखमांचा खुणा आहेत.
काही रिपोर्टनुसार, पतीने 60 वर्षांपूर्वी भेटलेल्या एका महिलेच्या पोस्टकार्डला रिप्लाय दिल्याचं कबूल केल्यावर बर्था नाराज झाली. महिलेच्या वकिलाने सांगितलं की, वृद्ध जोडप्यात वाद झाला होता, त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
हे सर्व वेदनादायक आहे. सध्या ही महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. याच दरम्यान, बर्था याल्टरचा नवरा या हल्ल्यातून सावरला आहे आणि तिला तुरुंगातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच आपण ठीक असल्याचं देखील आता सर्वांना सांगितलं आहे.