महिलेने केला होता 9 हजार कोटीचा फ्रॉड, मग 9 वर्ष नाव बदलून आरामात जगत होती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 01:20 PM2022-06-10T13:20:46+5:302022-06-10T13:22:46+5:30
Woman committed a fraud: द सन च्या रिपोर्टनुसार, या महिलेचं नाव साराह पॅनित्ज्के आहे. तिला स्पेनच्या सिव्हिल गार्डने एक छोटा भाग असलेल्या सांता बारबरामध्ये आपल्या श्वानासोबत फिरताना पकडलं होतं.
Woman committed a fraud: ब्रिटनच्या एका महिलेला स्पेन पोलिसांनी तेव्हा अटक केली जेव्हा ती तिच्या श्वानाला रस्त्यावर फिरायला घेऊन आली होती. ही महिला गेल्या 9 वर्षांपासून ब्रिटन पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये होती. या महिलेने 9 हजार कोटी रूपयांचा फ्रॉड केला आणि नंतर नाव बदलून ऐशोआरामाचं जीवन जगत होती.
या महिलेला स्पेनमधून अटक करण्यात आली आहे. येणाऱ्या काही दिवसात तिला स्पेनहून ब्रिटनकडे सोपवलं जाईल. त्याआधीच महिलेने प्रत्यार्पण रोखण्यासाठी स्पेन सरकारकडे अपील केली आणि यासाठी तिने कोर्टातही अर्ज सादर केला आहे.
द सन च्या रिपोर्टनुसार, या महिलेचं नाव साराह पॅनित्ज्के आहे. तिला स्पेनच्या सिव्हिल गार्डने एक छोटा भाग असलेल्या सांता बारबरामध्ये आपल्या श्वानासोबत फिरताना पकडलं होतं. ती याच भागात गेल्या सात वर्षांपासून राहत होती. इतकंच नाही तर येथील एका व्यक्तीसोबत तिने लग्नही केलं होतं.
ही महिला इंग्लंडच्या यॉर्कशायरची राहणारी आहे आणि तिचं खरं नाव साराह पॅनित्ज्के असं आहे. स्पेनमध्ये ती स्वत:ला इटालियन सांगून राहत होती आणि तिथे ती एंटोनिएटा आर्गुएलियो नावाने राहत होती.
साराहचा शोध पोलीस एका फ्रॉड केसमध्ये घेत होते. तिच्यावर इंग्लंडमध्ये 9 वर्षाआधी 9 हजार कोटींपेक्षा अधिकच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप सिद्ध झाला होता. त्यानंतर साराहला 8 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण तुरूंगात टाकण्याआधीच ती फरार झाली होती. आता ती काही दिवसांपासून स्पेनच्या तुरूंगात कैद आहे. लवकरच तिला ब्रिटनमध्ये आणलं जाईल. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण साराह इंग्लंडच्या नॅशनल क्राइम एजन्सीच्या लिस्टमध्ये असणारी पहिली महिला गुन्हेगार बनली आहे.