लाईव्ह टेलिकास्ट दरम्यान एका क्षणात गायब झाली महिला

By admin | Published: March 19, 2016 10:23 AM2016-03-19T10:23:24+5:302016-03-19T10:24:35+5:30

नॉर्वेतील एका टीव्ही चॅनेलचा हा व्हिडीओ असून एका इंटरव्ह्यूदरम्यान दिसणारी महिला काही क्षणात गायब झाल्याचे दिसत आहे

The woman disappeared in a moment during live teleicast | लाईव्ह टेलिकास्ट दरम्यान एका क्षणात गायब झाली महिला

लाईव्ह टेलिकास्ट दरम्यान एका क्षणात गायब झाली महिला

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून ३० लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. तुम्ही म्हणाल त्यात काय नवल ना? पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल आणि पुन्हा पुन्हा पहाल.. नॉर्वेतील एका टीव्ही चॅनेलचा हा व्हिडीओ असून एका इंटरव्ह्यूदरम्यान दिसणारी महिला काही क्षणात गायब झाल्याचे त्यात दिसत आहे. 
नॉर्वेतील एका टीव्ही चॅनेलवर स्पोर्ट्स सेंटरसाठी एका व्यक्तीची एअरपोर्टवर मुलाखत घेतली जात होती आणि त्याच्यामागे अनेक प्रवासी ये-जा करत होते. त्याचवेळी त्या व्यक्तीच्या मागे एका महिला उभी होती, पण अवघ्या काही क्षणांतच ती तेथून गायब झाली. हे पाहून त्या टीव्ही शोचे अँकरही अवाक् झाले. ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेण्यात येत होता, त्याच्या मागून एक स्त्री सूटकेसमधून आपले सामान घेऊन जाताना दिसत असून ती तेथे उभ्या असलेल्या महिलेशी बोलत होती. मात्र सामाना घेऊन जाणारी महिला चालताना पुढे गेली आणि तेवढ्यातच तिच्या मागे उभी असलेली स्त्री वळली आणि गायब झाली. जणू ती हवेतच मिसळून गेली. 
सोशल नेटवर्किंग साईटवर हा व्हिडीओ भलताच व्हायरल झाला असून सर्वजण त्या महिलेच्या गायब होण्यामागचं कोडं सोडवंत आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ पाहा आणि सांगा बरं ही महिला कुठे गायब झाली...?

Web Title: The woman disappeared in a moment during live teleicast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.