"मी दोन नोकऱ्या करते पण तरीही रोज रात्री मिळत नाही जेवण कारण..."; 'तिने' मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 04:46 PM2022-05-17T16:46:48+5:302022-05-17T16:48:47+5:30

Aimee Burrell : कमी पगार असल्याने जगणं थोडं अवघड झालं आहे. ती ज्या दुकानात काम करते तिथे तिला चिप्स मिळतात. जे खाऊन तिचं पोट भरतं.

woman does two jobs can not take dinner every day | "मी दोन नोकऱ्या करते पण तरीही रोज रात्री मिळत नाही जेवण कारण..."; 'तिने' मांडली व्यथा

फोटो - Aimee Burrell

googlenewsNext

"मी दोन नोकऱ्या करते पण तरीही रोज रात्री जेवण मिळत नाही" असं म्हणत एका महिलेने आपली व्यथा मांडली आहे. द सनने दिलेल्या माहितीनुसार, एमी बुरेल (Aimee Burrell) असं या तरुणीचं नाव आहे. ती ब्रिटनच्या Devon मध्ये राहते. ती प्राणीसंग्रहालयाच्या देखभालीचं काम करते. यासोबतच एका शॉपमध्ये देखील काम करते. ब्रिटनमध्ये महागाई वाढली आहे. त्यामुळे लोकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. 

एमीने दिलेल्या माहितीनुसार, कमी पगार असल्याने जगणं थोडं अवघड झालं आहे. ती ज्या दुकानात काम करते तिथे तिला चिप्स मिळतात. जे खाऊन तिचं पोट भरतं. पण तिच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. यामुळेच गेल्य़ा सहा आठवड्यात तिचं तीन किलोहून जास्त वजन कमी झालं आहे. ती दर तासाला 900 रुपये कमावते पण ते देखील जगण्यासाठी कमी पडतात.

"मला प्राणीसंग्रहालयात नोकरी करायला फार आवडतं. पण यामुळे गरजा पूर्ण होत नाहीत. शॉपमध्ये काम केल्यावर दररोज फ्रीमध्ये काही चिप्स मिळतात. जर ते मिळाले नाहीत तर मी खाण्यासाठी खर्च करू शकत नाही. मी भाड्याच्या फ्लॅटध्ये राहते. ज्याचं भाडं जवळपास 52 हजार रुपये द्यावे लागतात. तर इतरही बिल असतात" असं एमीने म्हटलं आहे. एमीसारखे असे अनेक लोक आहेत. ज्यांना एकवेळचं जेवण मिळणं देखील अवघड आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: woman does two jobs can not take dinner every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.