...म्हणून महिलेने आपल्या मुलाचं नाव ठेवलं 'Sky'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 01:13 PM2020-08-15T13:13:05+5:302020-08-15T13:16:11+5:30
एका महिलेने आपल्या बाळाचं नाव स्काय (SKY) असं ठेवलं आहे. त्यामागे कारणही खास आहे.
आई-वडील विविध गोष्टींवरून आपल्या मुलाचं नाव ठेवत असतात. हल्ली अर्थपूर्ण आणि हटके नाव ठेवण्याकडे पालकांचा अधिक कल असतो. याच दरम्यान एका महिलेने आपल्या बाळाचं नाव स्काय (SKY) असं ठेवलं आहे. त्यामागे कारणही खास आहे. आकाशात म्हणजेच विमानात बाळाचा जन्म झाला म्हणून महिलेने त्याचं नाव स्काय असं ठेवल्याची माहिती मिळत आहे.
क्रिस्टल हिक्स असं या महिलेचं नाव आहे. क्रिस्टल आपल्या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यासाठी विमानाने निघाली होती. ग्लेन्नालालेनहून ती अलास्काला जात होती. त्याच वेळी विमानात तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर क्रिस्टल आणि तिच्या बाळाला सुरक्षितरित्या अलास्कातील रुग्णालयात आणण्यात आलं. बाळाला सर्वात आधी ब्रिथिंग मशीनवर ठेवलं कारण बाळ प्रसूतीच्या वेळेआधीच जन्माला आलं आहे. एपी न्यूजने KTUU-TV चा हवाला देत हे वृत्त दिलं आहे.
KTUU-TV च्या रिपोर्टनुसार, जवळपास 18,000 फूट उंचावर बाळ जन्माला आलं आहे. म्हणूनच स्काय असं नाव ठेवण्यात आलं आहे. "एका तासातच माझं बाळ जन्मलं. सुरुवाताला धक्काच बसला, थोडं विचित्र वाटलं, काहीच समजत नव्हतं. विमानातील प्रत्येक जण फक्त बाळाबाबत बोलत होतं. विमानातील कर्मचाऱ्यांनी मला आणि माझ्या बाळाला सुखरूपरित्या रुग्णालयात पोहोचवलं" अशी प्रतिक्रिया क्रिस्टल यांनी दिली आहे.
Independence Day 2020 : "हाय स्पीड इंटरनेटने लोकांचे जीवन बदलणार"https://t.co/G10fkZHuoZ#IndependenceDayIndia#IndependenceDay2020#NarendraModi#internet
— Lokmat (@MiLOKMAT) August 15, 2020
Sushant Singh Rajput Death Case: रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्समधूनही अनेक गोष्टींचा खुलासा, महत्त्वाची माहिती आली समोर https://t.co/yPxoZzy7Ak#SushantSingRajputDeathCase#RheaChakrobarty#SushantSingRajput
— Lokmat (@MiLOKMAT) August 14, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण
Independence Day 2020 : "आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र"
सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी रिया 'या' व्यक्तीशी बोलली 1 तास, जाणून घ्या कोणाला केले शेवटचे 5 कॉल