याला म्हणतात नशीब! बिस्किट घ्यायला गेली अन् 16 कोटींची लॉटरी लागली, महिला झाली मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 04:30 PM2023-01-22T16:30:47+5:302023-01-22T16:31:34+5:30
महिला दुकानात बिस्किट खरेदी करण्यासाठी गेली होती, परंतु ती परत दुकानातून आल्यावर थेट करोडपती झाली आहे.
आपण श्रीमंत व्हावं, रातोरात भरपूर पैसे मिळावेत अशी अनेकांची इच्छा असते. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका महिलेचं नशीब फळफळलं आहे. तिला तब्बल 16 कोटींची लॉटरी लागली आहे. अमेरिकेतील एका महिलेसोबत असं घडलं आहे. महिला दुकानात बिस्किट खरेदी करण्यासाठी गेली होती, परंतु ती परत दुकानातून आल्यावर थेट करोडपती झाली आहे.
नॉर्थ कॅरोलिनाची रहिवासी असलेली 51 वर्षीय एमीलिया एस्टस एका झटक्यात 16 कोटींची मालकीण झाली आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, नुकतीच एमीलिया एका दुकानात बिस्किट खरेदी करण्यासाठी गेली होती. तेथून बिस्किटांसोबतच तिने नशीब अजमावण्यासाठी 1600 रुपयांचे लॉटरी स्क्रॅचकार्डही विकत घेतलं. यानंतर तिने कार्ड स्क्रॅच करून लॉटरी क्रमांकाशी कार्डचा नंबर जुळवला, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
एमीलियाने जॅकपॉट जिंकला होता यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. नॉर्थ कॅरोलिना एज्युकेशन लॉटरीच्या निवेदनानुसार, एमीलिया नेहमीप्रमाणेच दुकानात बिस्किट खरेदी करण्यासाठी आली होती, परंतु हा दिवस तिच्यासाठी खूप खास ठरला. तिने 1600 रुपये खर्च करून लॉटरीचे तिकीट खरेदी केले आणि त्या तिकिटावर तिने सुमारे 16 कोटी रुपयांचा जॅकपॉट जिंकला.
आपला अनुभव सांगताना एमीलिया म्हणाली की, दुकानात गेल्यावर तिला तिकीट काढावं असं आतला आवाज सांगत होता. तिने फक्त मनाचं ऐकलं आणि तिकीट घेतलं. आता या तिकिटामुळे तिचे नशीब उजळले. एका झटक्यात तिला करोडपती बनवलं. एमीलियाने पुढे सांगितले की, जॅकपॉट जिंकल्यानंतर जेव्हा ती घरी पोहोचली आणि तिच्या आईला याबद्दल सांगितले तेव्हा तिलाही आश्चर्य वाटले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"