महिलेने स्पर्म डोनरचा शोध घेऊन त्याच्याशी लग्न केलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2016 12:27 PM2016-03-25T12:27:11+5:302016-03-25T12:47:46+5:30

अमिन्हा हर्ट या महिलने इंटरनेटच्या सहाय्याने स्पर्म डोनर अँडरसनचा शोध घेतला. ज्यानंतर ते प्रेमात पडले आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं

The woman invented a sperm donor and got married to it | महिलेने स्पर्म डोनरचा शोध घेऊन त्याच्याशी लग्न केलं

महिलेने स्पर्म डोनरचा शोध घेऊन त्याच्याशी लग्न केलं

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत - 
सिडनी, दि. २५ - स्पर्म डोनरच्या सहाय्याने आई झालेल्या महिलेने स्पर्म डोनरचा शोध घेऊन त्याच्याशी लग्न केलं आहे. अमिन्हा हर्ट या महिलने इंटरनेटच्या सहाय्याने स्पर्म डोनर अँडरसनचा शोध घेतला. ज्यानंतर ते प्रेमात पडले आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं. महत्वाचं म्हणजे अमिन्हा हर्ट यांची आणि अँडरसनची कधीच भेट झाली नव्हती. तरीही अमिन्हा हर्टने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अँडरसन शेतकरी असून फुटबॉल प्रशिक्षकदेखील आहे. 
 
हॉस्पिलमध्ये उपलब्ध असणा-या माहितीच्या आधारे अमिन्हा हर्ट यांनी अँडरसनची माहिती मिळवली. त्यानंतर इंटरनेटच्या सहाय्याने अँडरसनचा शोध लावला, आणि ईमेलच्या सहाय्याने त्याच्याशी संपर्क साधला. अँडरसन याने सुरुवातीला भेटण्यात रस दाखवला नव्हता. मात्र जेव्हा त्याने त्याच्या मुलीचे फोटो पाहिले तेव्हा तो अमिन्हा हर्टला भेटण्यास तयार झाला. मेलबर्नमध्ये अँडरसनने अमिन्हा हर्ट आणि आपल्या मुलीची पहिल्यांदा भेट घेतली. 
या भेटीनंतर अँडरसन आणि अमिन्हा हर्ट एकमेकांच्या प्रेमात पडले. दोन वर्षाच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला फक्त आपल्या मुलीमुळे अँडरसनने भेटण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो असं अमिन्हा हर्ट यांनी सांगितलं आहे. 
 

Web Title: The woman invented a sperm donor and got married to it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.