सुनावणीत बलात्कार पीडितेला महिला न्यायाधीशाने विचारले अपमानास्पद प्रश्न
By admin | Published: March 9, 2016 06:04 PM2016-03-09T18:04:40+5:302016-03-09T18:28:44+5:30
बलात्काराच्या खटल्यामध्ये अनेकदा पीडित महिलेला न्यायालयात सुनावणी दरम्यान वाईट अनुभवातून जावे लागते.
Next
ऑनलाइन लोकमत
बासक्यू, दि. ९ - बलात्काराच्या खटल्यामध्ये अनेकदा पीडित महिलेला न्यायालयात सुनावणी दरम्यान वाईट अनुभवातून जावे लागते. पुरुष न्यायाधीशाऐवजी महिला न्यायाधीश असेल तर, पीडित महिलेसाठी थोडा दिलासा असतो.
पण स्पेनमध्ये बलात्काराच्या एका खटल्यामध्ये महिला न्यायाधीशानेच पीडितेची कुचंबणा करणारे प्रश्न विचारुन आपल्यातील असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले. स्पेनच्या बासक्यू कंट्री येथील न्यायाधीश मारीया डेल कारमेन मोलिना मानसिला यांनी सुनावणी दरम्यान बलात्कार पीडितेलाच आक्षेपार्ह प्रश्न विचारले.
न्यायाधीशाच्या या वर्तनाविरोधात स्पेनमध्ये क्लारा असोशिएशन या संघटनेने मोहिम उघडली आहे. महिला न्यायाधीशाला तात्काळ निलंबित करावे अशी त्यांची मागणी आहे. पीडितेवर अविश्वास दाखवणारी पूर्वग्रह दूषित मानसिकता दिसून येते असे या संघटनेने म्हटले आहे. बलात्काराच्यावेळी तू अंग झाकून घेतले होतेस का ? असा अपमानास्पद प्रश्न मारीया डेलने बलात्कार पीडितेला विचारला.