आंघोळीनंतर गेली महिलेच्या डोळ्याची दृष्टी, एक छोटीशी चूक पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 10:24 AM2022-10-10T10:24:26+5:302022-10-10T10:25:10+5:30

54 वर्षीय मेरी मेसनकडून एक अशी चूक झाली ज्यामुळे तिच्या डोळ्याची दृष्टी गेली. मेरी डोळ्यांसाठी कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करत होती. एक दिवस ती लेन्स लावूनच आंघोळीसाठी गेली.

Woman loses eye after she was having a shower England | आंघोळीनंतर गेली महिलेच्या डोळ्याची दृष्टी, एक छोटीशी चूक पडली महागात

आंघोळीनंतर गेली महिलेच्या डोळ्याची दृष्टी, एक छोटीशी चूक पडली महागात

Next

मानवी शरीरात अनेक संवेदनशील अवयव असतात. डोळे हे त्यातील एक. त्यांची काळजी घेणं फार गरजेचं असतं. एका छोट्या चुकीमुळे डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते. नुकतीच एका महिलेसोबत अशीच घटना घडली. या महिलेचं नाव मेरी मेसन आहे. मेरीने कधी विचारही केला नव्हता की, एका छोट्या चुकीमुळे तिच्या डोळ्याची दृष्टी जाईल. चला जाणून घेऊ काय झालं होतं तिच्यासोबत...

54 वर्षीय मेरी मेसनकडून एक अशी चूक झाली ज्यामुळे तिच्या डोळ्याची दृष्टी गेली. मेरी डोळ्यांसाठी कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करत होती. एक दिवस ती लेन्स लावूनच आंघोळीसाठी गेली. ज्यामुळे तिच्या डोळ्यांना इन्फेक्शन झालं. याच कारणाने तिच्या डोळ्यांची दृष्टी गेली. मेरीला हे इन्फेक्शन डाव्या डोळ्यात झालं होतं.

झालं असं की, आंघोळ करताना पाण्यातील मायक्रोस्कोपिक अमीबा मेरीच्या डोळ्याच्या कॉर्निया आणि कॉन्टॅक्ट लेन्सच्या मधे अडकला. Acanthamoeba केराटायटिस एक रेअर इन्फेक्शन आहे जे सूक्ष्म जीवामळे होतं. ज्यामुळे व्यक्तीच्या डोळ्यांची दृष्टी जाते. व्यक्ती अंध होऊ शकते.

बाजारात वेगवेगळ्या लेन्स मिळतात ज्यांचा वापरण्याचा काळ 1 दिवस, 1 महिना, 6 महिने किंवा 1 वर्ष असतो. मेरीने डोळ्यात 1 महिना कालावधी असलेली लेन्स लावली होती. आंघोळ करताना पाण्यातील अमीबा मेरीच्या डोळ्यात गेला आणि तो लेन्स व कॉर्निया मधे अडकला. नंतर हळूहळू अमीबामुळे इन्फेक्शन वाढलं. ज्यामुळे डोळ्याची दृष्टी कमी झाली. 

इन्फेक्शन झाल्यावर मेरी डॉक्टरांकडे गेली. यादरम्यान अनेक औषधोपचार केल्यावर काही ऑपरेशनही करण्यात आले. ज्यात तीन वेळा कॉर्निया सुद्धा ट्रान्सप्लांट करण्यात आला. या सगळ्यातून मेरीला काहीच फायदा झाला नाही. अखेर तिचा डोळा काढावा लागला. मेरीने सांगितलं की, यामुळे मला नोकरी सोडावी लागली. त्यावेळी मी शाळेतील किचनमध्ये काम करत होती. दर थोड्या वेळाने मला डोळ्यात औषध टाकावं लागत होतं. डोळ्यात खूप वेदना होत होती. मला कामही करता येत नव्हतं.

इन्फेक्शमुळे डोळा काढल्यानंतर मेरी आता हळूहळू नॉर्मल होत आहे. मेरी आता अॅडमिन असिस्टंट म्हणून काम करते. सोबतच मेरी तिचा पती जॉनथनसोबतही काम करते. एक डोळा नसल्याने तिला अजूनही काही कामे करण्यात अडचण येते. 

Web Title: Woman loses eye after she was having a shower England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.