भयंकर! छोट्याशा इन्फेक्शनमुळे महिलेचे कापावे लागले हात-पाय; 'ही' चूक ठरतेय जीवघेणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 01:20 PM2022-10-11T13:20:57+5:302022-10-11T13:37:27+5:30

काही आजार असे असतात ज्याची लक्षणं ही दिसून येत नाहीत. ज्यामुळे पुढे ते आजार गंभीर रुप घेतात. यामुळेच अनेकांना आपल्या शरीरातील काही अवयव हे गमवावे लागू शकतात.

woman lost all her limbs due to sepsis after getting urinary tract infection | भयंकर! छोट्याशा इन्फेक्शनमुळे महिलेचे कापावे लागले हात-पाय; 'ही' चूक ठरतेय जीवघेणी

भयंकर! छोट्याशा इन्फेक्शनमुळे महिलेचे कापावे लागले हात-पाय; 'ही' चूक ठरतेय जीवघेणी

Next

एखादा आजार असल्यास आपल्या शरीरात त्याची हळूहळू लक्षणं दिसण्यास सुरुवात होते. पण काही आजार असे असतात ज्याची लक्षणं ही दिसून येत नाहीत. ज्यामुळे पुढे ते आजार गंभीर रुप घेतात. यामुळेच अनेकांना आपल्या शरीरातील काही अवयव हे गमवावे लागू शकतात, असंच काहीस एका महिलेसोबत झालं आहे. युकेमध्ये राहणाऱ्या किम स्मिथ नावाच्या महिलेला सेप्सिस झालं ज्यामुळे तिला तिचे हात-पाय गमवावे लागले आहेत. 

एक छोटंस इन्फेक्शन इतकं गंभीर रुप घेईल असा किमने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. काही वर्षांपूर्वी किम सुट्टीचा आनंद घेण्यासाठी स्पेनमध्ये गेली होती. जिथे तिला यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊन सेप्सिसच्या समस्येचा सामना करावा लागला. साउथ वेस्ट न्यूज सर्व्हिसच्या एका रिपोर्टनुसार, यूटीआयनंतर किमच्या शरीरात पसरलेल्या सेप्सिसमुळे तिचे पाय आणि हात कापावे लागले आहेत. 

किम याआधी हेअर ड्रेसर म्हणून काम करत होती. अवयव खराब झाल्यानंतर आता ती डबल हँड ट्रान्सप्लांटची वाट पाहत आहे. SWNS शी संवाद साधताना किमने सांगितलं की, माझे अवयव कापण हेच योग्य होतं. डॉक्टरांनी जेव्हा मला याबाबत सांगितलं तेव्हा मी त्यांना तुम्हाला ठीक वाटेल ते करा असं सांगितलं, कारण मला माहिती होतं की माझे अवयव खराब झाले आहेत. आता डबल हँड ट्रान्सप्लांटनंतर मी कुकिंगसह सर्व कामं करेन अशी मला आशा आहे. 

CDC (Centers for Disease Control and Prevention) नुसार, जगभरात दरवर्षी जवळपास 17 लाख लोकांना सेप्सिसचा त्रास होतो. इन्फेक्शनमुळे याची सुरुवात होते. जेव्हा ते वाढतं तेव्हा ऑर्गन फेलचा मोठा धोका निर्माण होतो आणि यामध्ये व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. लंग, यूरिनरी ट्रॅक्ट, स्किन आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे सेप्सिसचा धोका खूप वाढतो. त्यामुळे वेळीच उपचार करा. यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे घट्ट कपडे घालणे, बाथरूमशी संबंधीत सवयी, डिहायड्रेशनमुळे होतं. त्यामुळे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: woman lost all her limbs due to sepsis after getting urinary tract infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.