प्रियकराच्या पैशांवर होता प्रेयसीचा डोळा, हॉस्पिटलमध्येच केली त्याची हत्या; जाणून घ्या कशी?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 11:42 AM2022-02-15T11:42:46+5:302022-02-15T11:43:16+5:30
स्पेनच्या वॅलेंसियामध्ये राहणारा ७० वर्षीय एका व्यक्तीला काही दिवसांपासून पोटाची समस्या होती. त्याला लूज मोशन सुरू झाले होते.
प्रेमात दगा मिळण्याच्या अनेक घटना नेहमीच समोर येत असतात. पण प्रेमात दगा आणि मग हत्या अशाप्रकारच्या घटना कमीच ऐकायला मिळते. अशीच एक घटना स्पेनच्या (Spain) वॅलेंसियामधून समोल आली आहे. इथे एका प्रेयसीने आपल्या प्रियकराची विषारी औषध देऊन हत्या (Girlfriend Murdered Boyfriend) केली. पोलिसांनी महिला आरोपीला अटक केली आहे.
स्पेनच्या वॅलेंसियामध्ये राहणारा ७० वर्षीय एका व्यक्तीला काही दिवसांपासून पोटाची समस्या होती. त्याला लूज मोशन सुरू झाले होते. त्रास वाढतच गेला आणि त्याला डायरिया झाला. तब्येत बरी झाली नाही म्हणून तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्याच्यासोबत ५६ वर्षीय गर्लफ्रेन्डही हॉस्पिटलमध्ये आली. हॉस्पिटलमध्येच गर्लफ्रेन्डने प्रियकराला मारण्याचा प्लान केला.
प्रियकराच्या पैशांवर होता डोळा
आरोपी महिलेने हे नातं सुरू होताच एक प्लानही सुरू केला होता. तिचा पूर्ण फोकस प्रियकराच्या पैशांवर होता. जेव्हा त्याला डायरिया झाला तेव्हा ती प्रियकरासोबत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. हॉस्पिटलमध्ये गर्लफ्रेन्ड त्याची सेवा करण्यात लागली होती. पण ती त्याला ठीक करण्याऐवजी त्याला आणखी आजारी करत होती.
लूज मोशनचं औषध देऊन मारलं
महिलेने व्यक्तीला खाण्यातून कांस्टिपेशनचं औषध देणं सुरू केलं होतं जे डायरियात अजिबात द्यायचं नसतं. यामुळे या व्यक्तीची तब्येत आणखी बिघडत गेली. साधारण सात महिने हॉस्पिटलमधेच त्याने डायरियामुळे जीव सोडला. साधारण सात महिन्यांपर्यंत हॉस्पिटलमध्ये राहिल्यावर त्याचा मृत्यू झाला. व्यक्तीच्या मृत्यूनंतर महिला गायब झाली.
व्यक्तीच्या मृत्यूनंतर जेव्हा नातेवाईकांनी त्याच्या संपत्तीची माहिती घेतली तेव्हा ते हैराण झाले. त्यांच्या खात्यातून £75,000 म्हणजे 76,71,622 रूपये गायब होते. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. प्रायव्हेट डिटेक्टिवच्या मदतीने पोलिसांनी आरोपी महिलेचा पत्ता काढला आणि तिला अटक केली. अटकेनंतर महिलेने तिचा सगळा प्लान वाढला.