उडत्या फ्लाइटमध्ये कपडे काढून महिला म्हणाली, धमाका होणार! मग एकच गोंधळ उडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 03:11 PM2022-08-18T15:11:20+5:302022-08-18T15:11:33+5:30

फ्लाइटमध्ये एका महिलेने तिचे कपडे काढले आणि ओरडत फ्लाइटच्या कॉकपिटकडे धावत गेली. महिलेने दोन वेळा कॉकपिटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. पण तिला एका व्यक्तीने अडवलं.

Woman stripped to underwear and tried to storm flight cockpit raising allahu akbar slogan | उडत्या फ्लाइटमध्ये कपडे काढून महिला म्हणाली, धमाका होणार! मग एकच गोंधळ उडाला

उडत्या फ्लाइटमध्ये कपडे काढून महिला म्हणाली, धमाका होणार! मग एकच गोंधळ उडाला

googlenewsNext

वेगवेगळ्या देशातील विमानांमध्ये घडणाऱ्या विचित्र घटना नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. अशीच एक विमानातील घटना समोर आली आहे. फ्लाइटमध्ये एका महिलेने तिचे कपडे काढले आणि ओरडत फ्लाइटच्या कॉकपिटकडे धावत गेली. महिलेने दोन वेळा कॉकपिटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. पण तिला एका व्यक्तीने अडवलं.

ही फ्लाइट सायप्रसहून मॅनचेस्टरला जात होती. 35 वर्षीय फिलिप ओ ब्रायनने महिलेला फ्लाइटच्या कॉकपिटमध्ये जाण्यापासून रोखलं. त्यानंतर महिलेला अडवण्यासाठी क्रू मेंबर्सची मदत घ्यावी लागली.

30 वर्षीय महिलेचा आरोप होता की, फ्लाइटमध्ये विस्फोटक आहेत आणि तिने मुलांना मृत्यूसाठी तयार राहण्यास सांगितलं होतं. महिलेने हेही सांगितलं की, तिचे पॅरेंट्स दहशतवादी संघटना ISIS चे मेंबरही होते. यानंतर फ्लाइटला डायवर्ट करण्यात आलं आणि पॅरिसमध्ये लॅंडींग करण्यात आलं. त्यानंतर महिलेला सिक्युरिटी ऑफिसर्स घेऊन गेले.

दरम्यान, फिलिप ओ ब्रायन हा एका ड्रेनेज फर्मचा मालक आहे. तो टीनएजमध्ये सिक्युरिटीचं काम करत होता. या फ्लाइटमध्ये तो त्याच्या सहा फॅमिली मेंबर्ससोबत प्रवास करत होता. त्यात त्याची पत्ननी आणि तीन मुलांचा समावेश आहे.

ओ ब्रायनने सांगितलं की, सगळं काही नॉर्मल होतं. पण टेकऑफ केल्यावर काही वेळाने एक महिला अंगावरील सगळे कपडे काढून सीट्सच्या मधोमध समोर आली. अल्लाहु अकबर म्हणत ती कॉकॉपिटचा दरवाजा वाजवू लागली होती.  

तो म्हणाला की, यानंतर सगळे लोक घाबरले आणि ओरडू लागले होते. मी स्टाफसोबत बोललो आणि त्यांना विचारलं की, तुम्ही या महिलेला का रोखत नाही आहात. तर ते म्हणाले की, आम्ही तिला रोखू शकत नाही आहोत. मग मीच प्रयत्न केला. मी तिला पकडलं. त्यानंतर पायलटने पॅरिसमध्ये इमरजन्सी लॅंडींग केलं.

ओ ब्रायन म्हणाला की, त्याने त्या महिलेला विचारलं की, ती असं का करत आहे? तर तिने सांगितलं की, जर तिने हे केलं नाही तर फ्लाइटमध्ये धमाका होईल आणि सगळे लोक मरतील.

Web Title: Woman stripped to underwear and tried to storm flight cockpit raising allahu akbar slogan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.