कपडे काढून अंतर्वस्त्रात शॉपिंग करू लागली होती महिला, अवाक् करणारं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 03:40 PM2022-01-04T15:40:21+5:302022-01-04T15:41:55+5:30

आइस्क्रीम पार्लरमध्ये महिला दाखल झाल्यावर तिला मास्कबाबत विचारण्यात आलं. तर तिने आपले अंगावरील कपडे काढून तोंडावर बांधले.

Woman strips down to her underwear to use her dress as a facemask at ice cream store in Argentina | कपडे काढून अंतर्वस्त्रात शॉपिंग करू लागली होती महिला, अवाक् करणारं आहे कारण

कपडे काढून अंतर्वस्त्रात शॉपिंग करू लागली होती महिला, अवाक् करणारं आहे कारण

Next

अर्जेंटिनामध्ये (Argentina) एक महिला विना मास्क आइस्क्रीम पार्लरमध्ये गेली. मास्क नसल्याने कर्मचाऱ्यांनी महिलेला हटकलं. पण त्यानंतर महिलेने जे केलं ते बघून सगळेच हैराण झाले. महिलेने असं काही केलं स्टोरमधील इतर ग्राहक अवाक् झाले. या महिलेचं कृत्य पार्लरमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे.

आइस्क्रीम पार्लरमध्ये महिला दाखल झाल्यावर तिला मास्कबाबत विचारण्यात आलं. तर तिने आपले अंगावरील कपडे काढून तोंडावर बांधले. महिलेने तिचे कपडे फेस मास्क बनवले आणि फक्त अंतर्वस्त्रांमध्ये ती शॉपिंग करू लागली.
पण तिची ही आयडिया तिच्या कामात आली नाही. कारण तोंडावर बांधलेले कपडे सतत खाली येत होते. अशात महिला कुणाला काही न बोलता आइस्क्रीम पार्लरमधून निघून जाते. धक्कादायक बाब  म्हणजे यावेळी एक व्यक्ती त्याच्या तीन मुलींसोबत तिथे होता. तोही सर्वांसमोर महिलेने केलेलं कृत्य पाहून हैराण झाला.

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, ही घटना १ जानेवारी २०२२ ची रात्री १०.४० वाजताची आहे. पश्चिम  अर्जेंटिना प्रांतातील मेंडोजाच्या गोडॉय क्रूज शहरात ही घटना घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

फुटेजमध्ये बघता येतं की, कशाप्रकारे एक व्यक्ती आपल्या तीन मुलींसोबत आइस्क्रीम पार्लरच्या काउंटरवर उभा आहे. इतक्यात एक महिला पार्लरमध्ये प्रवेश करते. मास्क नसल्याने महिलेला कर्मचारी हटकतात. यावर नाराज झालेली महिला सर्वांसमोर आपले शॉर्ट्स काढून तोंडावर बांधून घेते. 
 

Web Title: Woman strips down to her underwear to use her dress as a facemask at ice cream store in Argentina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.