स्त्रियांना समान वेतनासाठी आणखी ७० वर्षांची प्रतीक्षा
By Admin | Published: March 8, 2015 11:00 PM2015-03-08T23:00:00+5:302015-03-08T23:00:00+5:30
पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील वेतनात समानता येण्यासाठी आणखी तब्बल ७० वर्षे वाट बघावी लागेल, असे आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने (आयएलओ) म्हटले आहे
संयुक्त राष्ट्रे : पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील वेतनात समानता येण्यासाठी आणखी तब्बल ७० वर्षे वाट बघावी लागेल, असे आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने (आयएलओ) म्हटले आहे. आज पुरुषांच्या तुलनेत महिला सरासरी ७७ टक्के कमाई करतात.
महिला दिनानिमित्त आयएलओने म्हटले आहे की, वेतनाचा फरक हा स्त्रीला मुले असली तरी व नसली तरी कायम आहे. आज पुरुषाच्या तुलनेत स्त्री सरासरी ७७ टक्के कमाई करते. उच्च उत्पन्न कमावणाऱ्या महिलांसाठी हा फरक आणखी वाढत जातो. काम करणाऱ्या महिला आज २० वर्षांपूर्वीपेक्षा जास्त चांगल्या अवस्थेत आहेत का, असे विचारले असता त्याचे उत्तर हे निश्चितच होकारार्थी आहे.
वेतनाचा फरक दूर करण्यासाठी निश्चित कृती केली नाही तर आजच्या गतिनुसार तो दूर व्हायला २०८६ साल उजाडेल म्हणजे तब्बल ७१ वर्षे वाट पाहावी लागेल, असे आयएलओचे गाय रायडर म्हणाले. (वृत्तसंस्था)