Preet Chandi: उणे ५० डिग्री तापमानाता ४० दिवसांपर्यंत एकटी चालली ही महिला, अखेर रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 10:37 PM2022-01-04T22:37:52+5:302022-01-04T22:38:15+5:30
Preet Chandi: ब्रिटनमधील शीख आर्मी ऑफिसर प्रीत चंडी या दक्षिण ध्रुवावर सोलो ट्रिप करणाऱ्या पहिल्या बिगर श्वेत महिला बनल्या आहेत. असे करून त्यांनी इतिहास रचला आहे.
लंडन - ब्रिटनमधील शीख आर्मी ऑफिसर प्रीत चंडी या दक्षिण ध्रुवावर सोलो ट्रिप करणाऱ्या पहिल्या बिगर श्वेत महिला बनल्या आहेत. असे करून त्यांनी इतिहास रचला आहे. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार प्रीत यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये या ट्रिपचे आयोजन केले होते. त्यांनी अंटार्क्टिकामधील हर्क्युलस इनलेटपासून आपला प्रवास सुरू केला होता.
त्यांनी काही आठवडे अंटार्क्टिकामध्येही एकट्यानेच स्कीईंग करून घालवले. त्यानंतर ३ जानेवारी रोजी प्रीत यांनी घोषणा केली की, त्यांनी ४० दिवसांमध्ये ११२६ किमीचा ट्रॅक पूर्ण केला आहे. प्रीत चंडी यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले की, मी आता खूप भावूक झाले आहे.७ नोव्हेंबर २०२१ रोजी आपल्या प्रवासावर जाण्यापूर्वी ३२ वर्षीय प्रीत हिने सीएनएनवर सांगितले होते की, त्यांना अपेक्षा आहे की, त्यांचे साहसिक कार्य इतरांना प्रेरणादायी ठरेल. तसेच आपल्या सीमा पुढे विस्तारण्यासाठी आणि स्वत:वर विश्वास ठेवण्यासाठी प्रोत्साहित करेल.
तर दक्षिण ध्रुवावरील प्रवास पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्याय ब्लॉगवर लिहिले की, अंटार्क्टिका पृथ्वीवरील सर्वात थंड, सर्वात उंच आणि सर्वात शुष्क आणि सर्वाधिक हवा वाहणारे खंड आहे. तिथे कुणीही कायमस्वरूपी राहत नाही. तेथील तापमान उणे ५० डिग्री सेल्सियसपेक्षाही खाली जाते. जेव्हा मी पहिल्यांदा या ट्रिपचे प्लॅनिंग केले तेव्वा मला या खंडाबाबत अधिक माहिती नव्हती. मात्र मी तिथे जाऊ इच्छित होते. तत्पूर्वी मी अडीच वर्षांमध्ये स्वत:ला तिथे जाण्यासाठी तयार केले.