इन्स्टाग्रामवर ग्लॅमरस लाइफ दाखवणाऱ्या महिलेला कसे मिळाले १७ कोटी रूपये?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 05:44 PM2022-01-26T17:44:41+5:302022-01-26T17:45:14+5:30
इन्शुरन्स कंपनीने दावा केला की, इन्स्टाग्रामवर महिलेची ग्लॅमरस लाइफ बघून असं अजिबात वाटत नाही की, अपघातामुळे तिचं जीवन वाईट प्रकारे प्रभावी झालं आहे.
एका अपघाताची शिकार झालेल्या एका महिलेला तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्टच्या माध्यमातून खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न केला एका इन्शुरन्स कंपनीने. कंपनीने महिलेल्या जखमा गंभीर मानल्या नाहीत आणि तिच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी एक गुप्त व्हिडीओ ऑपरेशनही केलं होतं. इन्शुरन्स कंपनीने दावा केला की, इन्स्टाग्रामवर महिलेची ग्लॅमरस लाइफ बघून असं अजिबात वाटत नाही की, अपघातामुळे तिचं जीवन वाईट प्रकारे प्रभावी झालं आहे.
ब्रिटनच्या या केसमध्ये अॅक्सीडेंट क्लेमबाबत महिला आणि कंपनीत मोठा वाद सुरू होता. शेवटी कोर्टाने महिलेच्या बाजूने निकाल दिला आणि तिला १.७ मिलियन पाउंड म्हणजेच १७ कोटी रूपये देण्याचा कंपनीला आदेश दिला.
'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, रस्ते अपघाताची शिकार झालेल्या ३४ वर्षीय ब्रिटिश महिलेचं नाव नताशा पालमर आहे. नताशा माझी मीडिया एक्झिक्यूटीव्ह आहे. २०१४ मध्ये नशेत एका ड्रायव्हरने तिच्या कारला मागून टक्कर मारली होती. या घटनेने नताशाचं जीवन बदलून गेलं होतं.
महिलेला अपघातात गंभीर जखमा
या अपघातात महिलेला गंभीर जखमा झाल्या होत्या. या अपघातामुळे तिच्या मेंदूवरही वाईट प्रभाव पडला होता. मेंदूला इजा झाल्याने तिच्या शरीरात गंभीर मायग्रेन, कमजोर स्मरणशक्ती, एकाग्रता भंग, डोळ्यांची समस्या आणि चक्कर येणे यांसारख्या समस्या होऊ लागल्या होत्या. जेव्हा ती चालत होती तेव्हा ती नशेत असल्यासारखं वाटत होतं. एकंदर काय तर अपघातानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं
इन्शुरन्स कंपनीला वाटलं खोटं
नताशाच्या या समस्यांकडे इन्शुरन्स कंपनीने खास लक्ष दिलं नाही. त्यांना नताशाचं बोलणं खोटं वाटलं. जेव्हा नताशाने २ मिलियन पाउंडपेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळवण्यासाठी अपघात करणाऱ्या ड्रायव्हर Sererif Mantas वर लंडन कोर्टात केस केली. तर इन्शुरन्स कंपनीच्या वकीलाने नताशावर बेईमानीचा आरोप लावत सांगतलं की, ती तिच्या समस्या वाढवून सांगत आहे. कंपनीने तिला ५ लाख देणार सांगितलं होतं. पण नताशा यासाठी तयार झाली नाही.
कंपनीने महिलेच्या इन्स्टाग्रामचा घेतला आधार
जेव्हा हे प्रकरण कोर्टात पोहोचलं तेव्हा Liverpool Victoria इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने नताशा पालमरच्या इन्स्टाग्राम पोस्टचा आधार घेत तिला खोटं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तिच्या हालचालीवर लक्ष ठेवलं. कंपनीने कोर्टात नताशाच्या इन्स्टाग्राम फोटो आणि व्हिडीओ दाखवले. कंपनीने सांगितलं की, कशाप्रकारे अपघात झाल्यावरही नताशा आरामात एन्जॉय करत आहे.
इन्शुरन्स कंपनीने कोर्टा नताशाच्या शेकडो पोस्ट दाखवल्या. ज्यात ती स्कीइंग, परदेशवारी, म्युझिक कॉन्सर्ट इत्यादी ठिकाणी दिसत आहे. तिच्या या फोटोंच्या आधारावर कंपनीने दावा केला होता की, नताशा अपघाताच्या प्रभावाबाबत खोटं बोलत आहे. पण नताशाने काही ऐकल नाही. तिने मेडिकल पुरावे कोर्टात सादर केले. दरम्यान, कंपनीचं सांगणं कोर्टात काही खास प्रभाव टाकू शकलं नाही. न्यायाधीश एंथनी मेट्जर यांनी कंपनीचे दावे फेटाळले. कंपनीला १७ कोटी रूपये देण्याचा आदेश दिला.