महिलेचं नाव ISIS, फेसबुक म्हणतं ओळख पुरावा द्या
By admin | Published: July 2, 2016 05:48 PM2016-07-02T17:48:24+5:302016-07-02T17:48:24+5:30
ब्रिटनच्या ब्रिस्टोलची रहिवासी असलेल्या इसीस थॉमस या महिलेला फेसबुकने ओळख पुरावा मागितला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
लंडन, दि. 02 - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया (इसीस) ही दहशतवादी संघटना जगभरात आपलं जाळ पसरत आहे. आणि यासाठी सोशल मिडियाचा पुरेपूर वापर केला जात आहे. त्यांना रोखणं हेच आव्हान सोशल मिडियासमोर आहे, त्यामुळे त्यांना दूर ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जात आहेत. मात्र याचा कधीतरी वेगळाच परिणाम होता ज्याचा अनावधनाने एखाद्या व्यक्तीला फटका बसू शकतो. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये महिलेचं नाव ISIS असल्याने फेसबुकने महिलेकडे ओळख पुरावा मागितला.
इसीस थॉमस असं नाव असणारी ही महिला ब्रिटनच्या ब्रिस्टोलची रहिवासी आहे. 27 जूनला महिलेने फेसबूकवर लॉग इन केले असतना तिला नाव बदलण्यास सांगण्यात आलं. काहीच कल्पना नसलेल्या या महिलेला आपल्या आडनावामुळे लॉग इनमध्ये समस्या येत असल्याचा समज झाला.
'मी याअगोदर इसीस वोरकास्टर ( Isis Worcester) या नावाने फेसबुक अकाऊंट वापरत होते. इसीस थॉमस (Isis Thomas) माझं खरं नाव असून काम करत असलेल्या ठिकाणी काही अडचणी असल्याने मी हे आडनाव वापरत नव्हते. त्यामुळे मी आडनाव बदलल, पण त्यानंतरही समस्या सुटली नाही तेव्हा माझ्या नावामुळे ही समस्या येत असल्याचं माझ्या लक्षात आलं', अशी माहिती महिलेने दिली आहे.
ISIS हे चालणार नाही किंवा हे आमच्या नियमांत बसत नाही असा संदेश फेसबूकने पाठवला. त्यानंतर महिलेला ओळख पुरावादेखील मागण्यात आला. महिलेने पुरावा पाठवला आहे, पण यामध्ये खुप वेळ लागण्याची शक्यता आहे असं महिलेने सांगितलं आहे.