"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:32 IST2024-09-27T15:29:53+5:302024-09-27T15:32:03+5:30
Zakir Naik Son Fariq Naik Video : फारिक नाईकने सर्वप्रथम इस्लाममध्ये धर्म परिवर्तनासंदर्भात कबुली दिली आणि म्हणाला, महिलांचा धर्म बदलने पुरुषांच्या तुलनेत अधिक सोपे असते. कारण...

"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा!
Fariq Naik Video :
इस्लामिक धर्म गुरू झाकीर नाईकचा मुलगा फारिक नाईकने पाकिस्तानी यूट्यूबर नादिर अलीच्या पॉडकास्ट शोमध्ये धर्म परिवर्तनासंदर्भात खळबळजनक खुलासा केला आहे. तो या शोमध्ये इस्लाममध्ये धर्म परिवर्तनासंदर्भात माहिती देत होता. यावेळी होस्टने विचारले, पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे असते का? यावर, फारिक नाईकने सर्वप्रथम इस्लाममध्ये धर्म परिवर्तनासंदर्भात कबुली दिली आणि म्हणाला, महिलांचा धर्म बदलने पुरुषांच्या तुलनेत अधिक सोपे असते. कारण, अधिकांश महिलाच मुस्लीम धर्म स्वीकारतात. या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, आपला धर्म महिलांना अधिक सन्मान देतो.
यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स @pakistan_untold ने पोस्ट केला आहे. केवळ 23 सेकंदांच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये कुठल्याही प्रकारच्या संकोचाशिवाय फारिक नाईकने हे मान्य केले आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक प्रमाणावर इस्लाम धर्म स्वीकारतात. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 21 हजारहून अधिक वेळ बघितला गेला आहे. तो ओरिजनल नादिर अलीच्या यूट्यूब चॅनलवरून घेण्यात आला आहे.
यापूर्वी झाकीर नाईकनेही घेतला आहे या शोमध्ये भाग -
नादिर अलीने यापूर्वी, भारतात फरार म्हणून घोषित करण्यात आलेल्या झाकीर नाईकलाही अपल्या शोमध्ये आमंत्रित केले होते. यात नादिरने झाकीर नाईकला धर्माशी संबंधित अनेक प्रश्न विचारले होते. सध्या झाकीर नाईक आपल्या कुटुंबासह पाकिस्तानात आहे. याशिवाय, तो मलेशियातही राहतो.