चालत्या कारमध्ये शरीरसंबंध ठेवत होतं कपल, बॅलन्स बिघडलं अन् ट्रकला जाऊन भिडली कार...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 11:52 AM2022-06-10T11:52:27+5:302022-06-10T11:53:04+5:30
Car Accident: मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेक्शुअल अॅक्टिविटीमुळे ड्रायव्हरचं लक्ष विचलित झालं आणि एसयूव्हीचा अपघात झाला. महिला ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसली होती
Car Accident: गाडी चालवताना जराशी चूकही जीवावर बेतू शकते. अपघात टाळण्यासाठी सरकारने अनेक प्रकारचे नियम बनवले आहेत. तरीही लोक या नियमांकडे दुर्लक्ष करून ड्रायव्हिंग करतात आणि त्यांना याची भरपाई वेगवेगळ्या प्रकारे करावी लागते. अशीच एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महिला ड्रायव्हिंग करताना शरीरसंबंध ठेवत होती. ज्यामुळे अपघात झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेक्शुअल अॅक्टिविटीमुळे ड्रायव्हरचं लक्ष विचलित झालं आणि एसयूव्हीचा अपघात झाला. महिला ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसली होती आणि तिने अचानक रोमांस सुरू केला. महिलेचा पार्टनरही थांबला नाही आणि महिलाही थांबली नाही. अशात कारचा अपघात झाला. एसयूव्ही समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन भिडली आणि भयंकर अपघात झाला.
FEDEX CRASH: Woman performing oral sex on driver causes vehicle crash into FedEx truck. See the details here 👇https://t.co/ZIo4aFJPDH
— WPLG Local 10 News (@WPLGLocal10) June 3, 2022
local10.com च्या रिपोर्टनुसार ही घटना अमेरिकेतील आहे. येथील North Ocean Boulevard च्या रस्त्यावरून हा कार जात होती. त्यात दोन लोक प्रवास करत होते. एक पुरूष आणि एक महिला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रवास करताना महिला पुरूषासोबत शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होती.
या दरम्यान एसयूव्हीचा अपघात झाला. समोरून येत असलेल्या फे़ड एक्स ट्रकमध्येही दोन लोक प्रवास करत होते. अपघातात ट्रकमधील व्यक्तींना हलक्या जखमा झाल्या. रिपोर्टनुसार, कारमध्ये बसलेल्या पुरूषाच्या प्रायव्हेट एरियात इजा झाली आहे.
अपघातानंतर कारमधील पुरूष आणि महिला अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर पडलेले दिसले. तर पोलीस लगेच त्यांच्या मदतीसाठी धावून आली. अजून तरी याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल केला गेला नाही.