हिमवादळापासून वाचण्यासाठी कारमध्ये बसली; 18 तासानंतर डेडबॉडी सापडली...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 06:16 PM2022-12-27T18:16:01+5:302022-12-27T18:16:08+5:30
अमेरिकेत हिमवादळाने थैमान घातले असून, आतापर्यंत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेसह आजुबाजूच्या अनेक देशांमध्ये हिमवादळाने थैमान घातले आहे. यामुळे आतापर्यंत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले आहे. यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिमवादळापासून वाचण्यासाठी एक महिला कारमध्ये लपून बसली, पण यातच तिचा मृत्यू झाला.
हिमवादळामुळे अनेक भागातून लोकांच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत. या भीषण वादळाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सातत्याने समोर येत आहेत. वादळामुळे अनेक गाड्या आणि इतर वाहनांवर बर्फाची दाट चादर दिसून येत आहे. दरम्यान, या वादळामुळे टेलर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अँडेल टेलरने तिच्या कुटुंबाला पाठवलेला मदतीचा मेसेज अखेरचा ठरला.
नेमकं काय झालं?
मिळालेल्या माहितीनुसार, अँडेल टेलर कामावरुन घराकडे निघाल्यावर हिमवादळ सुरू होते. यावेळी अँडेल कारमध्येच बसून राहिली. वादळ बराच वेळ चालले. यावेळी बराच बर्फ अँडेलच्या कारवर पडला आणि तिची कार अडकली. यावेळी तिला बाहेर निघता आले नाही. यामुळे अँडेलचा कारमध्येच मृत्यू झाला.