इराकी बंडखोर शोध घेतायत स्त्रियांचा

By admin | Published: June 23, 2014 05:01 AM2014-06-23T05:01:50+5:302014-06-23T05:01:50+5:30

इराकमधील सुन्नी बंडखोरांनी अंबर प्रांतातील चार महत्त्वाची शहरे ताब्यात घेतली आहेत. शुक्रवारपासून चाललेल्या या कारवाईत रुतबा हे शहर शनिवारी रात्री ताब्यात घेण्यात आले आहे

Women seek out Iraqi insurgents | इराकी बंडखोर शोध घेतायत स्त्रियांचा

इराकी बंडखोर शोध घेतायत स्त्रियांचा

Next

बगदाद : इराकमधील सुन्नी बंडखोरांनी अंबर प्रांतातील चार महत्त्वाची शहरे ताब्यात घेतली आहेत. शुक्रवारपासून चाललेल्या या कारवाईत रुतबा हे शहर शनिवारी रात्री ताब्यात घेण्यात आले आहे.
इराकच्या तेल रिफायनरीवर ताबा मिळविल्यानंतर आयएसआयएस दहशतवादी बैजी गावात फिरत असून, घरोघर जाऊन स्त्रियांचा शोध घेत आहेत. प्रत्येक घरात किती स्त्रिया आहेत, त्यापैकी विवाहित किती व अविवाहित किती याची माहिती जाणून घेतली जात आहे. बहुतांश दहशतवादी अविवाहित आहेत. इराकमध्ये नागरिकांना ओळखपत्रे दिली जातात व त्यावर विवाहित, अविवाहित हा उल्लेख असतो. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Women seek out Iraqi insurgents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.