कोरोनाने सगळेच चक्र फिरले; महिला पॉर्नकडे, तर पुरुष चॉकलेट्सकडे वळले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 06:55 PM2020-09-16T18:55:59+5:302020-09-16T18:58:50+5:30
इ्स्रायली संशोधकांचा दावा; याआधीच्या सर्वेक्षणांना छेद
तणावाच्या परिस्थितीत पुरुष पॉर्नकडे आणि महिला चॉकलेट्स वळतात, असं मानलं जातं. पण इस्रायली संशोधकांनी आता वेगळाच दावा केला आहे. कोरोना संकट काळात स्थिती नेमकी उलट आहे. पुरुष चॉकलेट्सकडे वळले आहेत. तर महिला पॉर्न आणि मद्याकडे वळल्या आहेत. संशोधकांनी बेन गुरियन विद्यापीठात या संदर्भातील संधोशनाबद्दलची कागदपत्रं जमा केली आहेत.
जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. या काळात अनेकांच्या सवयी बदलल्या आहेत. त्याचा अभ्यास करण्यासाठी संशोधनकांनी सर्वेक्षण केलं. यामध्ये ११५ ब्रिटिश नागरिकांच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला. या ११५ नागरिकांमध्ये ४६ पुरुष आणि ६९ महिलांचा समावेश होता. या संशोधनातून पुढे आलेल्या निष्कर्षांची माहिती बीजीयू मार्केटिंग लॅबचे प्रमुख डॉ. इनाव फ्राईडमन यांनी दिली. 'तणावाच्या परिस्थितीत पुरुष मद्यसेवन आणि पॉर्नकडे, तर महिला गोड पदार्थांकडे वळतात, असं मानलं जातं. मात्र कोरोना संकट काळात परिस्थिती बदलली आहे. गुगल सर्चच्या माध्यमातून ही बाब समोर आली आहे,' असं त्यांनी सांगितलं.
भारताचा जुना मित्र कामी येणार; कोरोनावरील लसीचे १० कोटी डोस देणार
'कोरोना काळात सगळेच ताणतणावांचा सामना करत आहेत. त्यामुळे पुरुष आणि महिला तणावात असताना नेमका कशाचा आधार घेतात, याचा अभ्यास करण्यात आला. पुरुष आणि महिला तणावाखाली असताना नेमकं काय करतात, याचा अभ्यास याआधीही करण्यात आला होता. ग्राहकांचं वर्तन पाहण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आलं होतं. मात्र कोरोना काळात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील माहिती आधीच्या सर्वेक्षणातील निष्कर्षांना छेद देणारी आहे,' असं फ्राईडमन यांनी सांगितलं.
काळजी वाढली! अजून २ वर्ष कोरोनाच्या माहामारीपासून सुटका नाही; WHO च्या तज्ज्ञांचा दावा
'तणावाखाली असताना पुरुष पॉर्न आणि मद्याचा आधार घेतात. तर महिला गोड पदार्थांकडे वळतात, असं याआधी झालेल्या सर्वेक्षणांमधून समोर आलं होतं. त्यातूनच कंपन्यांनी महिला आणि पुरुष ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून काही गृहितकं आखली होती. मात्र कोरोना काळात यामध्ये मोठा बदल झाला आहे. त्यामुळे कंपन्यांना बाजाराचा आणि ग्राहकांचा विचार करून रणनीती बदलावी लागेल,' असं फ्राईडमन म्हणाले.