पुरुषांकडून मार खाण्यात आनंद मानणाऱ्या महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2017 12:54 AM2017-04-02T00:54:45+5:302017-04-02T00:54:45+5:30
इथिओपियातील महिलांना पुरुषांकडून मार खाल्ल्यावर स्वत:चा अभिमान वाटतो. या महिला आहेत आदिवासी हमर जातीच्या. या आदिवासींच्या रुढी
इथिओपियातील महिलांना पुरुषांकडून मार खाल्ल्यावर स्वत:चा अभिमान वाटतो. या महिला आहेत आदिवासी हमर जातीच्या. या आदिवासींच्या रुढी, परंपरा, प्रथांची माहिती घेतल्यास अनेक मनोरंजक गोष्टी समोर येतात.
फे्रंच छायाचित्रकार एरीक लैफोर्ग यांनी इथिओपियातील हमर आदिवासींना कॅमेऱ्याने टिपले. हमर आदिवासी खूपच वेगळे व त्यांच्या रुढी,परंपरा व रिवाज हे आपल्याला खूपच चक्रावून टाकणारे आहेत. एरीक यांनी सगळ््या इथिओपियाचा प्रवास केला व हमर जातींचे राहणीमान, दैनंदिन जगणे, त्यांच्या आवडीनिवडी यांची माहिती गोळा केली. हमर जातीचा झपाट्याने अस्त होत आहे अशा वेळेस एरीक यांनी हमर जातींची काही छायाचित्रे टिपली आहेत.
इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार हमर जातीचे लोक कॅटल जंपिंग समारंभ करतात. या समारंभात १५ गायींना एका रांगेत उभे केले जाते व युवक त्यांच्यावर उड्या मारत पलीकडे जातो. जो युवक यात अपयशी होतो त्याचे लग्न होत नाही व बायकांचा एक गट त्याला जोरदार मारहाणही करतो. यानंतर या युवकाच्या घरातील सगळ््या बायकांना मारहाण केली जाते. ही मारहाण त्यांच्या अंगातून रक्त येणार नाही तोपर्यंत होते.
महिलांना मारण्यासाठी पुरुषांचा गट असतो व त्याला ‘माजा’ म्हटले जाते. या सगळ््या मारहाण प्रकरणात कोणतीही महिला पळून जात नाही. एवढेच काय ज्या महिला मारहाणीतून वाचतात त्या ‘माजा’ समुहाकडून मार खाण्याची विनंती करतात. ही मार खायची प्रथा फक्त समारंभापुरतीच मर्यादित नाही तर या महिलांना त्या दोन मुलांची आई होईपर्यंत मारहाण केली जाते. हमर जातीच्या लोकांना यात काहीही चुकीचे वाटत नाही. महिलांचे म्हणणे असे की मार खाल्ल्यानंतर आम्हाला हिंमत येते व आम्ही अधिक आत्मविश्वासाने आमच्या कुटुंबाचे पालनपोषण करू शकतो.