सौदीत मिळणार महिलांना बिकीनी परिधान करण्याची मुभा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 05:06 PM2017-08-04T17:06:32+5:302017-08-04T17:09:13+5:30
सौदी अरेबियात आता लवकरच लग्झरी बीच रिसॉर्ट ओपन करण्यात येणार आहे. या बीचवर महिलांना बिकीनी परिधान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी रेड सी नावाचे रिसॉर्ट सुरु करण्याची घोषणा केली आहे.
रियाध, दि. 4 - सौदी अरेबियात आता लवकरच लग्झरी बीच रिसॉर्ट ओपन करण्यात येणार आहे. या बीचवर महिलांना बिकीनी परिधान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी रेड सी नावाचे रिसॉर्ट सुरु करण्याची घोषणा केली आहे. येथील नॉर्थवेस्ट कोस्टलाइनजवळ रिसॉर्ट उभे करण्यात येणार आहे.
सौदीतील अर्थव्यवस्था वाढविण्याच्यादृष्टीने बीचवर रेड सी रिसॉर्ट ओपन करण्यात येणार आहे. सौदीच्या पब्लिक इन्वेस्टमेंट फंडने दिलेल्या माहितीनुसार, लग्झरी रिसॉर्टमध्ये जगभरातील पर्यटक येतील. येथे येणा-या पर्यटकांना पॅरॉशूट, ट्रॅकिंग अशा अनेक अॅक्टिव्हिटीज् या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. तसेच, या रिसॉर्टचे बांधकाम 2019 मध्ये सुरु करण्यात येणार असून 2020 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, सौदीत महिलांच्याबाबतील अनेक नियम आहेत. त्यामुळे येथील महिला गाडी चालवू शकत नाहीत किंवा आपल्या नव-याच्या परवानगीशिवाय कोठेही प्रवास करु शकत नाहीत. तसेच, महिलांना घराबाहेर पडायचे असेल, तर त्यांना आपले केस आणि शरीर झाकावे लागते. गेल्याच महिन्यात एका महिलेला मिनीस्कर्ट परिधान केल्यामुळे अटक करण्यात आली होती. अशाप्रकारचे अनेक कायदे सौदीत महिलांच्याबाबतीत तयार करण्यात आले आहेत. यामुळे त्यांना आत्तापर्यंत महिलांचा बिकीनीत बीचवर जाण्याचा संबंधच येत नव्हता. मात्र, आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या रिसॉर्टच्या निर्मितीनंतर या ठिकाणी महिलांना बिकनी परिधान करता येणार आहे. याचबरोबर, सध्या सौदीतील रिसॉर्टमध्ये मद्यपान करण्यास बंदी घातलेली. त्यामुळे आगामी काळात या रिसॉर्टमध्ये मद्यपानास मुभा देण्यात येणार आहे का, या अद्याप कोणत्याही निर्णय घेण्यात आला नाही.